लवीनाने गेल्या आठवड्यात आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिनं महेश भट्ट हेच फिल्म इंडस्ट्रीतील डॉन आहेत, असं म्हटलं. त्यांचा भाचा सुमित सभरवालशी आपण लग्न केलं आहे आणि तो ड्रग्ज सप्लाय करतो, शिवाय मानवी तस्करीही करतो आणि याची माहिती महेश भट्ट यांनाही आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच हे सर्व धंदे चालतात असं तिनं सांगितलं. हे वाचा - 'ती' ड्रग पार्टी नव्हतीच! करण जोहरच्या पार्टीत आलेल्या कलाकारांना NCBचा दिलासा हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर महेश भट्ट यांनी आपले वकील अमित नाईक यांच्यामार्फत लवीनाला कायदेशीर नोटीस बजावली. लवीनाने आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले होते. शिवाय सोमवारी मुंबई हायकोर्टातही याचिका दाखल केली. आपली मानहानी केल्याप्रकरणी लवीनाकडून एक कोटी रुपये मागितले आहेत. तिला हा व्हिडीओ हटवण्याचेही निर्देश द्यावेत अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. तसंच भविष्यात तिनं आपल्यावर असे खोटे आरोप करू नये, असं या याचिकेत म्हटलं आहेत. लविनाचा पती सभरवालशी भट्ट भावंडांचा थेट संबंध नाही. तो आपल्या बहिणीच्या पतीच्या भावाचा मुलगा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हे वाचा - भावाच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन लवीना लोधने 2010 साली हिमेश रेशमियासह कजरारे फिल्ममधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. या फिल्मचं दिग्दर्शन महेश भट्ट आणि पूजा भट्टने केलं होतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress