Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Gandhi Movie: 'गांधी'चित्रपटातील अंत्यसंस्काराच्या सीनसाठी जमले होते तब्बल 4 लाख लोक; जाणून घ्या किस्सा

Gandhi Movie: 'गांधी'चित्रपटातील अंत्यसंस्काराच्या सीनसाठी जमले होते तब्बल 4 लाख लोक; जाणून घ्या किस्सा

गांधी'(Gandhi) या चित्रपटात अभिनेता बेन किंग्सले (Ben Kingsley)यांनी मोहनदास करमचंद गांधी यांची साकारलेली भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या फार जवळ असल्याचं जाणवतं.

गांधी'(Gandhi) या चित्रपटात अभिनेता बेन किंग्सले (Ben Kingsley)यांनी मोहनदास करमचंद गांधी यांची साकारलेली भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या फार जवळ असल्याचं जाणवतं.

गांधी'(Gandhi) या चित्रपटात अभिनेता बेन किंग्सले (Ben Kingsley)यांनी मोहनदास करमचंद गांधी यांची साकारलेली भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या फार जवळ असल्याचं जाणवतं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 2ऑक्टोबर- आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती साजरी केली जात आहे. याचं निमित्ताने आम्ही आज आपल्याला त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातील एक किस्सा सांगणार आहोत. तसं तर महात्मा गांधींवर अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. मात्र 'गांधी'(Gandhi) या चित्रपटात अभिनेता बेन किंग्सले (Ben Kingsley)यांनी मोहनदास करमचंद गांधी यांची साकारलेली भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या फार जवळ असल्याचं जाणवतं. ते बापूंच्या व्यक्तिमत्वाच्या फार जवळ पोहोचले होते. बेन किंग्सले हे एक ब्रिटिश अभिनेता आहेत. आणि त्यांनी १९८२ मध्ये आलेल्या 'बापू' चित्रपटता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भूमिका साकारली होती.

" isDesktop="true" id="612232" >

१९८२ मध्ये आलेल्या 'गांधी' हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय झाला होता. तसेच बेन किंग्सले यांनी स्वतः बापूवर आधारित या चित्रपटाने मला बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. तसेच २०१९ मध्ये बेन यांनी या चित्रपटासंबंधी अनेक आठवणी सांगितल्या होत्या. यावेळी त्यांनी 'गांधी' या चित्रपटातील बापूंच्या अंत्यसंस्काराच्या सीनचा एक किस्सा सांगितला होता. यावेळी त्यांनी खुलासा करत म्हटलं होतं, 'या सीनच्या शूटिंगसाठी तब्बल ४ लाख लोक जमा झाले होते'. जीक्यूला दिलेल्या एका मुलाखतीत, बेन किंग्सले यांनी म्हटलं होतं, ' मला वाटतं गांधींच्या भूमिकेमुळे मला लोकांचं खूप प्रेम भेटलं. तसेच माझ्या लोकप्रियतेने माझी इंडस्ट्रीत मागणी वाढली होती. भारतातील लोक खूप उदार मनाचे आहेत. हे खुपचं अद्भुत होतं, तुम्हाला माहिती आहे, या चित्रपटातील अंत्यसंस्काराच्या सीनसाठी जवळजवळ ४ लाख लोक सहभागी झाले होते. हे माझ्यासाठी खूपचं आश्चर्यचकित करणारं होतं.

(हे वाचा:HBD: जर्नालिस्टचं स्वप्न पाहणारी मुलगी बनली प्रसिद्ध अभिनेत्री; हिना खानचा.....)

बेन यांनी स्वतः मान्य करत खुलासा केला होता, की पडद्यावर गांधीजी साकारणं असंभव आहे. याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं, 'मला आजही आठवत रिचर्ड एटनबरोने मला महात्मा गांधी यांचे काही फुटेज पाहण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी एका वेळेत पाच तासांची रियल न्यूज फुटेज पाहिली होती. तेव्हाच विचार केला होता कि हे निभावणं अशक्य आहे. आणि चित्रपट सोडून दे परत फुटेज नाही पाहायचं. मी एक फूट वर उठणार तर काही क्षणात ५ फूट खाली जाणार, मात्र रिचर्ड एटनबरोने हे शक्य करून दाखवलं.

(हे वाचा:VIDEO: गार्डसोबतच्या या वर्तवणुकीमुळे Kareena Kapoor झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी....)

'गांधी' या चित्रपटाने लोकप्रियता मिळवत इतिहास रचला होता. या चित्रपटाची स्टार कास्टसुद्धा तगडी होती. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री रोहिणी हातगंडी, ओम पुरी, सय्यद जाफरी, अमरीश पुरी, नीना गुप्ता यांच्यासमवेत अनेक देशी-विदेशी कलाकार होते. या सर्वांनी आपल्या भूमिका अत्यंत चोख बजावत या चित्रपटाला अमर केलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Mahatma gandhi