या मालिकांचा विशेष भाग नाही पाहिलात तर काय पाहिलं?

या मालिकांचा विशेष भाग नाही पाहिलात तर काय पाहिलं?

कलर्स मराठीवरील महारविवारच्या विशेष भागामध्ये मैत्री आणि प्रेमाच्या रंगांची उधळण होणार आहे.

  • Share this:

मुंबई, २४ मार्च- कलर्स मराठीवरील महा रविवारच्या विशेष भागामध्ये मैत्री आणि प्रेमाच्या रंगांची उधळण होणार आहे. घाडगे & सून मालिकेमध्ये अक्षय आणि अमृताचे नाते नाजूक वळणावर येऊन पोहचले आहे. जिथे कियाराने तिच्या खोट्या वागण्याने अक्षयचा विश्वास पूर्णपणे गमवला आहे आणि यामधून बाहेर येण्यासाठी अक्षय अमृतामध्ये कुठेतरी दुरावलेली मैत्री शोधू लागला आहे. अमृताला अक्षयच्या मनाची घालमेल कळते आहे. आता ती हे सत्य घरच्यांना आणि अक्षयला कसे सांगेल हा मोठा प्रश्न तिच्यासमोर आहे.

तसेच सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये अनू सिद्धार्थच्या घरी येऊन गेली. नेहा आणि सिद्धार्थच्या बोलण्यातून त्याला समजते की अनूला रंग खेळायला खूप आवडायचे परंतू अवीच्या अचानक जाण्याने अनू रंगपंचमी साजरी करत नाही. आता महारविवारच्या रंगपंचमी विशेष भाग रंगणार असून अनुच्या आयुष्यात सिद्धार्थ पुन्हा प्रेमाचा रंग आणू शकेल का? अक्षय- अमृता रंगपंचमी कशी साजरी करतील? हे पाहणे रंजक असणार आहे.

याचबरोबर महाराष्ट्र जागते रहो या कार्यक्रमाचादेखील विशेष भाग महारविवारमध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा या तीन मालिकांचे विशेष भाग पाहायला विसरू नका. आज रविवारी म्हणजे २४ मार्च दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता नक्की पाहा फक्त कलर्स मराठीवर.

VIDEO: महिलेची छेड काढणाऱ्या साधूला नागरिकांनी फलाटावरच दिला प्रसाद

First published: March 24, 2019, 6:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading