मुंबई 18 मे: प्रेक्षकांचं गेली 4 वर्षांपेक्षा निखळ मनोरंजन करणारा सोनी वाहिनीवरील (Sony Marathi) लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) अत्यंत अतरंगी विनोदवीरांच्या टोळ्यांनी नटलेला हा तुफान विनोदी कार्यक्रम लवकरच बंद होत असल्याची चर्चा सुरू आहे. या शोच्या बंद होण्याची कुणकुण सोनी मराठीचे कन्टेन्ट हेड अमित फाळके (Amit Phalke) यांच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे लागली. यात त्यांनी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांचे फोटो शेअर करत हा सीजन संपण्याबद्दल माहिती दिली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम 2018 पासून प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करत आहे. राजकीय नेत्यांपासून, युट्युब स्टार्स पर्यंत सगळ्याना हास्यजत्रेचं वेड आहे. कठीण काळात सर्वाना हुरूप देणारा हा कार्यक्रम असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या कार्यक्रमात प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता आवटे, समीर चौगुले अशी विनोदाचे षटकार उडवणारी फौज आहे. तर या कार्यक्रमाचं परीक्षण सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक करतात. प्राजक्ता माळी या कार्यक्रमाची निवेदिका आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा केवळ मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय नाहीये तर अनेक हिंदी भाषिक प्रेक्षक सुद्धा नेमाने हा कार्यक्रम बघतात. या कार्यक्रमाची भुरळ बॉलिवूडच्या कलाकरांनासुद्धा आहे. कोविडच्या काळातही लोकांचं मनोरंजन करण्यात या कार्यक्रमाने कसर सोडली नाही. त्यामुळेच सर्वाधिक पसंतीस उतरलेला हा कार्यक्रम बंद होतोय म्हणल्यावर चाहते हिरमुसले आहेत.
हेही वाचा - Cannes 2022: एक दिवस कान्स फिल्म फेस्टिव्हल भारतात होईल; दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य
असं समजतं की या कार्यक्रमाची जागा KBC चा नवा सीझन अर्थात "कोण होणार करोडपती" घेणार आहे. याशिवाय महाराष्ट्राची हास्यजत्राचा नवाकोरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि त्यात आणखी नवे विषय आणि भन्नाट स्किट्स बघायला मिळतील अशीही माहिती मिळत आहे.
Published by:Rasika Nanal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.