Home /News /entertainment /

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचं मुलाबरोबर Twinning! कमेंट्सचा पडतोय पाऊस

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचं मुलाबरोबर Twinning! कमेंट्सचा पडतोय पाऊस

Maharashtrachi Hasya Jatra: अभिनेत्री नम्रता संभेरावच्या या फोटोवर प्रेक्षकांच्या कमेंट्सा पाऊस पडत आहे.

  मुंबई, 5 जुलै : सोनी मराठीवर प्रदर्शित (Sony Marathi)होणारा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi hasyajatra) कार्यक्रम प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असतो. पोट धरुन हसवणाऱ्या या कार्यक्रमातील कलाकार अभिनेत्री नम्रता संभेराव(Actress namrata sambherao) नेहमीच चर्चेत असते. कोणत्याही परिस्थितीत हसवण्याचं काम उत्तम प्रकारे करत आणि आपल्या अभिनयाची छाप सोडत अभिनेत्री नम्रता संभेराव चांगलीच लोकप्रिय झाली आहे. नम्रता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी चांगले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. अशातच नम्रतानं (namrata sambherao shared photo with her son)तिच्या मुलासोबत एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नम्रता संभेरावनं इन्स्टाग्रामवर(Namratra sambherao Instagram) मुलगा रुद्राजसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये माय-लेकांनी सारख्याच रंगाचे कपडे घातल्याचं दिसत आहे. Twinning with boy म्हणत नम्रतानं हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनेक लाईक्स आणि कमेंट येत असलेल्या पहायला मिळत आहे. 'खूप गोड, लय भारी...' अशा अनेक प्रतिक्रिया फोटोवर येत आहेत. हेही वाचा - अरे आओ ना फिर! संजय जाधव स्वतःच्या सिनेमासाठी झाला डान्सर; करतोय अफलातून प्रमोशन नम्रता तिचा मुलगा रुद्राजसोबत(Namrata sambherao son raudraj) अनेक भन्नाट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून पसंतीही मिळताना पहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत संवाद साधत असते. तिच्या आगामी प्रोजेक्टविषयीही ती चाहत्यांना माहिती देताना दिसते.
  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून नम्रता घराघरांत पोहचली. नम्रतानं अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयानं तीनं प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. तिच्या चाहता वर्गही बराच मोठा आहे. त्यामुळे नेहमीच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो. दरम्यान, नुकतंच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची संपूर्ण टीमने लोणावळ्यामधे पावसाळी ट्रिपचा मनमुराद आनंद लुटला. अभिनेता समीर चौघुले आणि अभिनेत्री नम्रता संभेराव यांनी सुद्धा या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Instagram, Instagram post, Marathi entertainment

  पुढील बातम्या