Home /News /entertainment /

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पोहोचली नॅशनल पार्कात; हटके पद्धतीने साजरी केली Diwali; पाहा PHOTO

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पोहोचली नॅशनल पार्कात; हटके पद्धतीने साजरी केली Diwali; पाहा PHOTO

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या ( maharashtrachi hasyajatra) कलाकारांनी नुकतच दिवाळीनिमित्त वृक्षारोपण करून हरित( harit diwali) दिवाळी साजरी केली आहे.

  मुंबई, 30 ऑक्टोबर : प्रत्येक जण आपल्या परीने दिवाळी साजरी करत असतो. त्यातही समाजउपयोगी काम करून दिवाळी साजरी करणारी मंडळी मोजकीच असते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या ( maharashtrachi hasyajatra) कलाकारांनी नुकतच दिवाळीनिमित्त वृक्षारोपण करून हरित( harit diwali) दिवाळी साजरी केली आहे. सध्या यांच्या या उपक्रमावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंटचा वर्षाव होत आहे. यासोबतच कौतुक देखील होत आहे. दिवाळीचं औचित्य साधून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या कलाकारांनी नॅशनल पार्क, बोरिवली येथे वृक्षारोपण केले. प्रेक्षकांना हसविण्यात माहीर असलेले हे कलाकार पर्यावरणाबाबतही जागरूक आहेत. दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक सचिन मोटे, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, निखिल बने, दत्तात्रेय मोरे, श्यामसुंदर राजपूत, अरुण कदम या कलाकारांनी यंदा हरित दिवाळी साजरी केली. त्यांच्या या संकल्पनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
  समीर चौघुले यांनी याचे काही फोटो शेअर करत म्हटलं आहे की, महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या संपूर्ण कुटुंबाने नॅशनल पार्क बोरीवली येथे सह्याद्री देवराई संस्थेच्या सहयोगाने वृक्ष लागवड करून हरित दिवाळी साजरी केली..आणि लागवड केलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ही घेतली आहे. वाचा : 'ड्रामा क्वीन' पुन्हा झाली ट्रोल; राखीच्या अरेबियन LOOK ची युजर्सनी उडवली खिल्ली 'सह्याद्री देवराई' या सामाजिक संस्थेच्या मदतीने हे वृक्षारोपण केले. यावेळी संस्थेचे खजीनदार सचिन चांदणे आणि चैतन्य गाडगीळ, सचिन ठाकुर, निशांत भारद्वाज, समाधान लबदे, शंतनु हेर्लेकर आणि सिद्धार्थ पडियार हे सभासद उपस्थित होते. वाचा :  'डोक्यावर टोपी-हातात दांडू' लवकरच भेटीला येतोय 'पांडू'; भाऊ-कुशलची जोडी करणार... दिवाळीनिमित्त या कलाकारांनी समाजउपयोगी काम करत चांगला संदेश दिला आहे. त्यांच्या या उपक्रमातून सर्वांना एक प्रेरणा मिळाली आहे. सोशल मीडियावर देखील याच कौतुक होत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tv serial

  पुढील बातम्या