Home /News /entertainment /

'डोक्यावर पडलेली मुलगी...' समीर चौगुलेची 'या' अभिनेत्रीविषयीची पोस्ट चर्चेत

'डोक्यावर पडलेली मुलगी...' समीर चौगुलेची 'या' अभिनेत्रीविषयीची पोस्ट चर्चेत

समीर चौगुले (samir choughule ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सध्या त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रामधील एका अभिनेत्रीविषयी पोस्ट लिहिली आहे. त्यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

  मुंबई, 10 मे- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra )हा कॉमेडी शो सध्या संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हासवताना दिसतो. यातील प्रत्येक कलाकाराचा सोशल मीडियावर वेगळा चाहता वर्ग आहे. या शोमधील समीर चौगुले (samir choughule ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सध्या त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रामधील एका अभिनेत्रीविषयी पोस्ट लिहिली आहे. त्यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. समीर चौगुली यांनी दुसऱ्या तिसऱ्या कुणाविषयी नाही तर शिवाली परब ( Shivali Parab )  हिच्याविषयी एक पोस्ट केली आहे. कारण देखील खास आहे. शिवाली परबचा आज, 10 मे रोजी   ( Shivali Parab bithday ) वाढदिवस आहे. चाहत्यांसह सेलेब्सकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सगळ्यात अभिनेते समीर चौगुले यांची पोस्ट मात्र सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. वाचा-जेव्हा पुष्पवल्ली-दीपा भेटतात! अभिज्ञा भावे-रेश्मा शिंदेचे हटके PHOTO आले समोर समीर चौगुले यांनी शिवालीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत म्हटलं आहे की, happy birthday. माझी अत्यंत लाडकी, माझ्या सारखीच वेडी, डोक्यावर पडलेली मुलगी कम मैत्रीण..म्हणजे मुलगी कमच मैत्रीणचं जास्त...आमच्या शिवात madness ठासून भरलेला आहे...स्वाभाविक विनोद अत्यंत स्वाभाविकपणे सादर करणे हा तिचा हातखंडा..आमची शिवा खूप गुणी, विनोदाच अचूक टायमिंग साध्य असलेली आणि प्रचंड conviction ने काम करणारी मेहेनती मुलगी आहे... वाचा-'मी मागे फिरायचं ठरवत होते..' 'आई कुठे..' फेम अरुंधतीची नवी पोस्ट चर्चेत "शीवाली हे खरंय" सिरिजचा madness लीलया पेलणारी आणि सह कलाकाराला ही अचंबित करणारी आमची शिवा जगातला एकमेव अॅंटीक पिस आहे...शिवा तुला खूप खूप प्रेम....तुला आयुष्यात सगळ मिळो... happy birthday...समीर चौगुले यांनी वाढदिवसानिमित्त शिवालीविषयी खास पोस्ट लिहिली आहे.
  शिवालीने खूप कमी वेळेत हास्यजत्रेत आपलं स्थान प्रस्थापित केलं. पाय इन द स्काय, व्हॉट्सॲप लग्न आणि वेक अप या चित्रपटातून तिनं काम केलं आहे. तिची पहिली मालिका हृदयात वाजे समथिंग होती.शिवालीला नृत्याची देखील आवड आहे. तिने सीएचएम कॉलेजमधून (चांदीबाई हिंमतलाल मनसुखानी कॉलेज, उल्हासनगर) युथ फेस्टिव्हलमध्ये भाग घ्यायची. उत्तुंग ही एकांकिका देखील तिनं केली आहे. तिला विभवांतर या एकांकिकामधील उत्कृष्ट अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालंय.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या