Home /News /entertainment /

'माझी स्वामींची भेट...!', केदार शिंदेंनी सांगितला 25 वर्षांपूर्वीचा स्वामींच्या भेटीचा प्रसंग

'माझी स्वामींची भेट...!', केदार शिंदेंनी सांगितला 25 वर्षांपूर्वीचा स्वामींच्या भेटीचा प्रसंग

दिग्दर्शक केदार शिंदे यांची स्वामी समर्थांवर नितांत श्रद्धा आहे. स्वामी केदार शिंदेंच्या आयुष्यात कसे आले याविषयी त्यांनी सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

  मुंबई, 04 जुलै: महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा दमदार सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे ( Kedar Shinde Post) सध्या सिनेमाच्या कामात व्यस्त आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांचा वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ते शेअर करत असतात. केदार शिंदे हे स्वामी समर्थांचे भक्त ( Swami Samarth) आहेत हे आजवर सर्वांना माहिती आहे. त्यांची स्वामींवर नितांत श्रद्धा आहे.  नेहमीच ते स्वामींच्या चरणी स्वत: नतमस्तक होताना आपण पाहिलं आहे. 'स्वामींमुळे मी आहे', असं केदार शिंदे नेहमीच त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात. पण स्वामी केदार शिंदेंच्या आयुष्यात कसे आले याविषयी त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं आहे. केदार शिंदे यांनी स्वामी समर्थांबरोबर सुरू झालेला 25 वर्षांचा प्रवास त्यांच्या छोट्याशा पोस्टमधून सांगितला आहे. केदार शिंदेंनी म्हटलंय, ३ जुलै १९९७... माझ्या 'आमच्या सारखे आम्हीच' या नाटकाचा शुभारंभ. दुपारी साडेतीन वाजता प्रयोग शिवाजी मंदिर मध्ये! कलाकार मंडळी रंगभुषेला बसली आणि मी जवळपास कुठे मंदिर आहे का? या विचाराने बाहेर पडलो'. हेही वाचा - 'खूप थंडी होती, मी आणि भाऊ.... 'दोघांच्याच मैफलीची आठवण सांगताना कुशल बद्रिकेनं शेअर केला खास VIDEO
  View this post on Instagram

  A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

  केदार शिंदेंनी पुढे लिहिलयं,  'डोक्यात फक्त नाटकाचा विचार. कसं होणार? काय होणार? एकाने सांगितले की पुढे डाव्या बाजूला एक मंदिर आहे. मी वळलो तर एक जुनं मंदिर दिसलं. नमस्कार करून आत शिरल्यावर एक मोठी तसबीर दिसली. त्यावर लिहीलं होतं  श्री स्वामी समर्थ ! ही माझी स्वामींची भेट. आज त्याला २५ वर्ष पुर्ण झाले. केदार शिंदे आणि स्वामींच्या भेटीला आज तब्बल 25 वर्ष पूर्ण झालेत. यावेळी ही त्यांनी स्वामींप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करत  'मी फक्त स्वामींमुळे आहे. ही सेवा अखंड सुरू ठेवा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना!!!', असं म्हटलं आहे. या सुंदर पोस्टसह केदार शिंदे यांनी स्वामींच्या मोठ्या तसबीरीसमोर बसलेला त्यांचा एक फोटो शेअर केला आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या