liveLIVE NOW

LIVE : दिलासादायक! ऑक्सफर्ड लशीच्या क्लिनिकल चाचणीला पुन्हा सुरुवात, MHRAकडून मिळाला हिरवा कंदील

राज्यासह देशभरातील कोरोनाचे अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

 • News18 Lokmat
 • | September 12, 2020, 20:06 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A YEAR AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  20:53 (IST)

  ऑक्सफर्ड आणि अस्त्राझेनेकानं लसीच्या चाचण्यांना पुन्हा सुरुवात
  ब्रिटनच्या आरोग्य विभागाची माहिती
  भारत बायोटेकच्या लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी

  20:45 (IST)

  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याची चिंता वाढली
  राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाख 37,765
  राज्यात आज कोरोनाच्या 22,084 नव्या रुग्णांची नोंद
  राज्यात सध्या 2 लाख 79 हजार 768 अॅक्टिव्ह रुग्ण
  राज्यात आज दिवसभरात 391 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात आज 13 हजार 489 रुग्णांना डिस्चार्ज

  20:5 (IST)

  अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोरोनाव्हायरस लशीच्या क्लिनिकल चाचण्या पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. या चाचण्या सुरक्षित असल्याची पुष्टी मेडिसिन्स हेल्थ रेग्युलेटरी ऑथॉरिटीने (एमएचआरए) दिल्याचं कंपनीने शनिवारी सांगितले. याबाबत रॉयटर्स आणि एएफपी या वृत्तसंस्थांनी माहिती दिली आहे.

  19:44 (IST)

  ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी समित्यांची स्थापना
  जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर समित्या -आरोग्यमंत्री
  जिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू -आरोग्यमंत्री राजेश टोपे
  आपत्कालिन परिस्थितीत 50 ड्युरा, 200 जम्बो सिलेंडर राखीव
  विभागीय आयुक्तांना निर्देश दिल्याची राजेश टोपेंची माहिती
  ऑक्सिजनची प्रतिदिन आवश्यकता संकलित करण्याचे निर्देश

  19:30 (IST)

  अभिनेत्री कंगना राणावत घेणार राज्यपालांची भेट
  कंगना उद्या दुपारी 4.30 वा. राज्यपालांना भेटणार

  18:55 (IST)

  भाजप विरुद्ध शिवसेना वादात आता 'विहिंप'ची उडी
  कंगनावरील कारवाईवरून अयोध्येतल्या संतांचा संताप
  'उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये'
  विश्व हिंदू परिषदेसह हनुमानगढीच्या महंतांचा इशारा 

  18:54 (IST)

  'लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून...'
  मी माझे कार्य पुढे करत राहीन, कंगनाचं मराठीतून ट्विट
  'घाबरवण्याचा प्रयत्न केला तरीही धैर्यानं पुढे जात राहीन'
  जय हिंद, जय महाराष्ट्र - कंगना राणावत

  18:30 (IST)

  अभिनेत्री कंगनाबाबत आताची सर्वात मोठी बातमी 

  18:25 (IST)

  अभिनेत्री कंगना राणावत घेणार राज्यपालांची भेट
  कंगनानं राज्यपालांकडे मागितली भेटीसाठी वेळ
  उद्या कंगना आणि राज्यपालांची भेट होण्याची शक्यता

  18:14 (IST)

  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. उद्या ही भेट होण्याची शक्यता आहे. कंगनाचा महाराष्ट्र सरकारसोबत संघर्ष सुरू असतानाच तिने राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. उद्या ही भेट होणार का आणि या भेटीत नेमकी काय चर्चा होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

  मुंबई, 12 सप्टेंबर : राज्यासह देशभरातील कोरोनाचे अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.