Cyber Alert! फ्री वेबसाइटवर 'हे' सिनेमा किंवा वेबसीरिज पाहणं पडेल महागात, महाराष्ट्र सायबरचा इशारा
भारत आणि चीनमधील वाढता तणाव लक्षात घेता भारतामध्ये सायबर हल्ल्याचा धोका वाढल्याचा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून देखील वेळोवेळी अलर्ट राहण्याचा सल्ला देण्यात आहे.
मुंबई, 01 जुलै : भारत आणि चीनमधील वाढता तणाव लक्षात घेता भारतामध्ये सायबर हल्ल्याचा धोका वाढल्याचा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून देखील वेळोवेळी अलर्ट राहण्याचा सल्ला देण्यात आहे. दरम्यान आर्थिक धोका टाळण्यासाठी विविध बँकांनी देखील त्यांच्या ग्राहकांना अलर्ट मेसेज पाठवले आहेत. मात्र देशातील नागरिकांना एका वेगळ्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. तुम्ही जर एखाद्या वेबसाइटवरून फ्रीमध्ये चित्रपट पाहत आहात, तर तुमचा मोबाइल किंवा कंप्यूटर हॅक होऊ शकतो, असा इशारा महाराष्ट्र सायबर विभागाने (Maharashtra Cyber Department) दिला आहे. महाराष्ट्र्र सायबर विभागाने 10 चित्रपट आणि 10 वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे. हा कंटेट फ्री वेबसाइटवर न पाहण्याचा सल्ला विभागाकडून देण्यात आला आहे. या वेबसाइटवर क्लिक केल्यास मालवेअर डाउनलोड होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरील माहिती हॅक होऊ शकते.
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) June 29, 2020
गेल्या काही काळात इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढले आहे, त्याचा फायदा सायबर हल्ला करणारे भामटे करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाययाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात ट्वीट देखील करण्यात आले आहे.
सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट, वेब सिरीज पाहणे किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता. त्यामुळे त्यापासून सावधानता बाळगावी किंवा दूर रहावे- @MahaCyber1 चे आवाहन pic.twitter.com/Z0AbNSHPXb
महाराष्ट्र सायबर विभागाने कोणत्याही फ्री कंटेट देणाऱ्या बनावट वेबसाइटवर जे चित्रपट आणि सीरिज पाहून नका असे जाहीर केले आहे. विभागाकडून 10 वेबसीरिज आणि 10 चित्रपटांची यादी जाहीर केली गेली आहे, याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. या चित्रपट आणि वेबसीरिजची यादी खालीलप्रमाणे:
चित्रपट- मर्दानी 2, जुटोपिया, जवानी दिवानी, छपाक, लव्ह आज कल, इन्स्पेशन, बाहुबली, रजनीगंधा, गल्लीबॉय आणि बाला