मतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं

मतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं

मतदान केल्यानंतर जेव्हा जया बच्चन बाहेर आल्या तशा त्या मतदान केंद्रावरील एका अधिकाऱ्यावर भडकल्या. इतकंच नाही तर तिथं असलेल्या मीडियावरही त्या चिडलेल्या दिसल्या.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : महाराष्ट्रात सोमवरी 288 जागांवर मतदान झालं. या दिवशी सामान्य सर्वसामान्य जनतेसोबतच बॉलिवूड सेलिब्रेटींनीही मतदान केलं. आमिर खान, ऋतिक रोशन, माधुरी दीक्षित, गोविंदा, प्रीति झिंटा, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, शाहरुख खान आणि गुलजार सारख्या सेलिब्रेटींचा समावेश होता. दरम्यान मतदानासाठी मतदान केंद्रावर आलेल्या जया बच्चन अचानक तिथल्या एका अधिकाऱ्यावर भडकल्या.

झी न्यूजनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जया बच्चन मुंबईतील जुहूच्या मतदान केंद्रावर पोहोचल्या. यावेळी त्याच्यासोब ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन सुद्धा होते. मतदान केल्यानंतर जेव्हा जया बच्चन बाहेर आल्या तशा त्या मतदान केंद्रावरील एका अधिकाऱ्यावर भडकल्या. जया मत देऊन बाहेर आल्यावर तिथल्या एका अधिकाऱ्यानं जया यांच्याकडे फोटो काढण्याची विनंती केली. याच कारणानं जया बच्चन त्या अधिकाऱ्यावर रागावल्या.

Indian Idol च्या स्पर्धकानं नेहा कक्करला केलं KISS, इतर परीक्षक का होते गप्प?

जया बच्चन त्या अधिकाऱ्याला म्हणाल्या, हे खूपच चुकीचं आहे. मी या ठिकाणी मतदान करण्यासाठी आले आहे. तुम्ही अधिकारी आहात आणि ड्युटीवर असताना तुम्ही अशाप्रकारे फोटो मागू शकत नाही. मी तुमची तक्रार करणार आहे. त्यानंतर तिथं असलेल्या मीडियावरही त्या चिडलेल्या दिसल्या आणि कॅमेरामनला धक्का देत रागारागानं आपल्या कार मध्ये जाऊन बसल्या. जया बच्चन यांनी अशाप्रकारे मीडिया किंवा चाहत्यांवर भडकण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकादा त्या फोटो मागितल्यानंतर अशाप्रकारे चाहत्यावर चिडताना दिसल्या आहेत.

'या' सेलिब्रेटींनी शेअर केले HOT PHOTO, एक तर आहे युवराज सिंहची एक्स गर्लफ्रेंड

महाराष्ट्रा व्यतिरिक्त काल हरियाणा विधनसभेतही मतदान झालं. या मतदानचे निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहेत. महाराष्ट्राच्या 288 जागांवर 3,237 उमेदवार मैदानात उतरले होते. ज्यात 235 महिलांचा समावेश होता. यावेळी भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अभिनेता नील नितिन मुकेशचा मुलीसोबत क्यूट डान्स, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

==============================================================

VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 09:04 AM IST

ताज्या बातम्या