'आता महाराष्ट्र कुणाची वाट पाहतो....स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे, नेतानिवडीसाठी नाही'

'आता महाराष्ट्र कुणाची वाट पाहतो....स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे, नेतानिवडीसाठी नाही'

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमाचे लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरविंद जगताप यांनी सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीतवर केलेलं भाष्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : राज्यात सुरू असलेल्या सत्तावाटपाच्या खेळावर एका लेखकाने नोंदवलेलं निरीक्षण सोशल मीडियावर भलतंच व्हायरल होत आहे. चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाचे लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरविंद जगताप यांनी सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीतवर केलेलं भाष्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालं आहे. त्यांनी लिहिलेली एक फेसबुक पोस्ट सगळीकडे फिरत आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप महाराष्ट्रात नवं सरकार आलेलं नाही. कुणाचा मुख्यमंत्री, कुणाचा विरोधी पक्षनेता असा नेतानिवडीचा कार्यक्रम अजूनही सुरू आहे. त्यासाठी राज्याबाहेरचे निरीक्षक किंवा बडे नेते इथे येत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यावरून सेना -भाजपमध्ये तणाव वाढलेला असतानाच या सगळ्यावर भाष्य करणारी एक पोस्ट लेखक अरविंद जगताप यांनी लिहिली.

आघाडी आणि युतीत धमक नाही, असं म्हणताना जगताप लिहितात, 'स्वतःच्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्नं तरी दाखवू नका. पुन्हा कधीच महाराजांच्या नावाने मत मागू नका.'

या पोस्टमधून अप्रत्यक्षपणे भाजप आणि काँग्रेस पक्षाला बाण मारला गेला आहे.

वाचा - शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी अमित शहा मुंबईत येणार अशी चर्चा होती. तसंच काँग्रेस नेतेही सोनिया गांधी आणि दिल्लीतल्या बड्या नेत्यांच्या दबावाखाली असतात. अरविंद जगताप यांनी फेसबुक वॉलवर लिहिलेल्या या पोस्टमध्ये म्हटलंय - 'गुजरातचे त्याकाळचे सत्ताधारी लोक एक मराठी राजा येईल म्हणून घाबरायचे.

वाचा - भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेला मोठा धक्का

त्या मराठी राजांचं नाव होतं शिवाजी महाराज. आता महाराष्ट्र कुणाची वाट पाहतो? कधी अहमद पटेल. कधी अमित शहा. आघाडी आणि यूतीत धमक नाही. स्वत:च्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्नं तरी नका दाखवू. पुन्हा कधीच महाराजांच्या नावाने मत मागू नका. स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे. नेतानिवडीसाठी नाही.'

ही पोस्ट हजारहून अधिक लोकांनी शेअर केली आहे आणि शेकडो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

सोशल मीडियावर या पोस्टची चर्चा आहे.

-------------------------------

अन्य बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यामुळे युतीत वाढली दरी, उद्धव ठाकरे म्हणाले...

धक्कादायक! BCCIने पैसेच दिले नाहीत, भारतीय संघ अडकला परदेशात

पाकिस्तान: ट्रेनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी नेलेल्या सिलिंडरचा स्फोट; अग्नितांडवात 70 हून अधिक मृत्युमुखी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 03:13 PM IST

ताज्या बातम्या