Home /News /entertainment /

Home Minister मध्ये आता तब्बल 11 लाखांची पैठणी मिळणार.. सुचित्रा बांदेकरांचा हा आहे खरा राग; धम्माल VIDEO

Home Minister मध्ये आता तब्बल 11 लाखांची पैठणी मिळणार.. सुचित्रा बांदेकरांचा हा आहे खरा राग; धम्माल VIDEO

गेल्या 18 वर्षापासून होम मिनिस्टर सुरू आहे. आदेश बांदेकर ( aadesh bandekar) वहिनींना मानाची पैठणी देऊन सन्मान करत आहेत. आता या शोमध्ये मोठा बदल होणार आहे.

  मुंबई, 28 मार्च- झी मराठीवरील लोकप्रिय शोपैकी होम मिनिस्टर (homeminister ) हा एक शो आहे. सर्वांचे लाडके भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर हा शो होस्ट करताना दिसतात. गेल्या 18 वर्षापासून होम मिनिस्टर सुरू आहे. आदेश बांदेकर ( aadesh bandekar)  वहिनींना मानाची पैठणी देऊन सन्मान करत आहेत. आता या शोमध्ये मोठा बदल होणार आहे. नावापासून ते पैठणीपर्यंत सर्वंच नवीन असणार आहे. कारण आता गृहिणींना 11 लाखांची पैठणी मिळवण्याची संधी मिळणार आहे. येत्या 11 एप्रिल पासून होम मिनिस्टर हा शो ‘महामिनिस्टर’ या पर्वात बदलणार आहे. गृहिणी या नवीन पर्वासाठी मात्र खूपच उत्सुक आहेत. महामिनिस्टरच्या नवीन पर्वाचा पहिला वहिला प्रोमो देखील चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये सुचित्रा आदेश बांदेकर  (suchitra bandekar) यांच्यासोबत वाद घालताना दिसते आहे. गेल्या 18 वर्षात 5000 गृहिणींना पैठणी देऊन सन्मानित केले, मात्र मला एकही पैठणी तुम्हाला द्यावीशी नाही वाटली? आणि आता तर काय महामिनिस्टर घेऊन जाणार 11 लाखांची पैठणी...आता मला बॅग भरायला सांगाच तुम्ही.. असं सुचित्रा बांदेकर रागाता म्हणत असताना दिसत आहेत. यावेळी आदेश बांदेकर यांनी गप्पा राहणं पसंत केलं आहे. त्यांचा हा प्रोमो व्हिडिओ प्रेक्षकांना मात्र प्रचंड आवडलेला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  होम मिनिस्टर हा शो यापूर्वी संध्याकाळी 6 ते 6.30 पर्यंत झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत होता.मात्र आता या नव्या पर्वात अनेक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. सोमवार ते शनिवार महामिनिस्टर आता एक तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या मनोरंजनासोबतच आता गृहिणींना तब्बल 11 लाखांची पैठणी देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला वर्गात मात्र आनंदाचे वातावरण आहे. 11 लाखांची पैठणी कशी दिसत असावी? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. त्यांची ही उत्सुकता 11 एप्रिल रोजी झी मराठी वाहिनीवरून उलगडताना दिसणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या