VIDEO : शेवटचा एपिसोड शूट झाल्यावर ढसाढसा रडले होते 'महाभारत'चे कालाकार

VIDEO : शेवटचा एपिसोड शूट झाल्यावर ढसाढसा रडले होते 'महाभारत'चे कालाकार

'महाभारत' मालिकेशी संबंधीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : सध्या संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही पडला असून अनेक मालिकांचं शूटिंग सुद्धा रद्द झालं. त्यामुळे सध्या टीव्हीवर नवीन असं काही राहिलेलं नाही. अशात एकेकाळच्या लोकप्रिय मालिका रामायण आणि महाभारतचं रि-टेलिकास्ट करण्यात आलं आणि या मालिकेच्या शूटिंगच्या वेळचे काही किस्से आणि मालिकेतील कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमांना आताही तेवढंच प्रेम मिळालं जेवढं त्यावेळी मिळालं होतं.

दूरदर्शनवर या मालिकांचं रि-टेलिकास्ट सुरू झालं आणि या मालिकांशी संबंधीत काही व्हिडीओे आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून रामायण आणि त्यातील कलाकारांची जोरदार चर्चा सुरू असतानाच 'महाभारत' मालिकेशी संबंधीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ बीआर चोप्रा यांच्या या मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशीचा आहे असं बोललं जात आहे.

जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी ICU मध्ये दाखल

छोट्या पडद्यावर एकमेकांचे विरोधक म्हणून वावरणारे कौरव आणि पांडव शूटिंग संपल्यावर मात्र एकमेकांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले होते. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, युधिष्ठिर, कृष्ण, दुर्योधन, द्रौपदी, धृतराष्ट्र, अर्जुन यांच्यासह इतर अनेकजण एकमेकांना भेटत आहेत आणि रडत आहेत. यासाठी की याच्यानंतर ते पुन्हा सेटवर एकमेकांसोबत दिसणार नाहीत.

हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येत की, हे सर्वजण जरी स्क्रिनवर एकमेकांचे दुश्मन म्हणून वावरत असले तरीही खऱ्या जीवनात मात्र ते एकमेकांचे चांगले सहकारी आणि मित्र होते. त्यामुळेचया शोनंतर दूर जाण्याची कल्पना त्यांना सहन होत नव्हती. त्या सर्वांमध्ये एक खास बॉन्डिंग होतं.

लॉकडाऊनमुळे महिनाभर ब्युटी सर्व्हिस बंद; पाहा आपल्या या स्टार्सचा बिनमेकअपचा लुक

बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत एक एक सीन असा शूट करण्यात आला होता की तो सीन खराखुरा वाटू लागला होता. लोकांना असं वाटू लागलं होतं की जेव्हा खरं महाभारत घडलं तेव्हाही हे असंच सर्व घडलं असावं. चाहते याच कलाकारांना खऱ्या महाभारताच्या व्यक्तिरेखा म्हणून पाहतात. द्रौपदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपा गांगुलीनं वस्त्रहरणाचा सीन असा साकारला होता की त्याच्या दोन खास गोष्टी होत्या. हा सीन कोणत्याही रिटेकशिवाय साकारला गेला होता आणि दुसरं म्हणजे रुपा गांगुली त्यात एवढ्या एकरुप झाल्या होत्या की, अखेर त्या खरंच रडू लागल्या होत्या.

अमेयने मराठीत वाचलं इरफानचं ‘ते’ पत्र, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

First published: April 30, 2020, 9:06 AM IST
Tags: mahabharat

ताज्या बातम्या