Home /News /entertainment /

महाभारत मालिकेतील अभिनेते सतीश कौल याचं कोरोनामुळं निधन

महाभारत मालिकेतील अभिनेते सतीश कौल याचं कोरोनामुळं निधन

एकेकाळी कोट्यवधींचे मालक असलेल्या सतीश कौल यांच्याकडे आज उपचारासाठी नव्हते पैसे

    मुंबई 11 एप्रिल: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळं एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बी.आर.चोप्रा यांच्या महाभारत या सुपहिट मालिकेतील इंद्र या व्यक्तिरेखेमुळं ते लोकप्रिय झाले होते. सतीश यांच्या निधनामुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘महाभारत’ मालिकेबरोबरच त्यांनी ‘आंटी नंबर १’, ‘कर्मा’, ‘जंजीर’, ‘खेल’, ‘राम लखन’, ‘खुनी महल’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. कधीकाळी कोट्यवधींची संपत्ती बाळगणारे सतीश कौल करिअरच्या उत्तरार्धात हलाखीचं आयुष्य जगत होते. चित्रपटांमधून मिळालेल्या संपत्तीतून त्यांनी एक अभिनय शाळा सुरु केली होती. मात्र यामध्ये त्यांना मोठं नुकसान झालं. याचदरम्यान त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना सोडून गेले. त्यामुळं ते मानसिकदृष्ट्या खचले होते. याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाली. अन् उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अवश्य पाहा - सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ देशात २४ तासांत आढळले 1 लाख 52 हजार 879 पॉझिटिव्ह रुग्ण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात 24 तासांत 1 लाख 52 हजार 879 करोनाबाधित आढळून आले आहेत. तर 90 हजार 584 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. 24 तासांत 839 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 1 लाख 69 हजार 275 जणांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Actor, Entertainment, TV serials, Vaccinated for covid 19

    पुढील बातम्या