Home /News /entertainment /

'महामिनिस्टर' सुरू होण्याआधीच 11 लाखांची पैठणी वादात कारण...

'महामिनिस्टर' सुरू होण्याआधीच 11 लाखांची पैठणी वादात कारण...

11 एप्रिल पासून होम मिनिस्टर हा शो ‘महामिनिस्टर’ (maha minister ) या पर्वात बदलणार आहे. शोचं सध्या जोरदाप प्रमोशन सुरू आहे. पण या 11 लाखाच्या पैठणीवरून शो सध्या सोशल मीडियावर (maha minister troll)ट्रोल होत आहे.

  मुंबई, 7 एप्रिल- झी मराठीवरील लोकप्रिय शोपैकी होम मिनिस्टर (homeminister ) हा एक शो आहे. सर्वांचे लाडके भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर हा शो होस्ट करताना दिसतात. गेल्या 18 वर्षापासून होम मिनिस्टर सुरू आहे. आदेश बांदेकर ( aadesh bandekar) वहिनींना मानाची पैठणी देऊन सन्मान करत आहेत. आता गृहिणींना 11 लाखांची पैठणी मिळवण्याची संधी या शोच्या माध्यमातून मिळणार आहे. येत्या 11 एप्रिल पासून होम मिनिस्टर हा शो ‘महामिनिस्टर’ (maha minister ) या पर्वात बदलणार आहे. शोचं सध्या जोरदाप प्रमोशन सुरू आहे. पण या 11 लाखाच्या पैठणीवरून शो सध्या सोशल मीडियावर (maha minister  troll)ट्रोल होत आहे. सध्या सगळीकडं महामिनिस्टरच्या 11 लाखाच्या पैठणीची गृहीणींमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली दिसत आहे. सोशल मीडियावर देखील झी मराठीकडून याचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. मात्र काहींनी ही 11 लाखाच्या पैठणी देण्यासा विरोध दर्शवला आहे. नेटकऱ्यांनी ‘महामिनिस्टर’ सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं आहे. झी मराठीनं शोचे अनेक प्रोमो शेअर केले आहेत. त्यापैकी एक प्रोमोमध्ये आदेश बांदेकर सांगताना दिसत आहेत की, अस्सल हिऱ्यांनी जडली गेली पाहिजे ही पैठणी तरच महामिनिस्टरा शोभुन दिसेल ही 11 लाखाची पैठणी..यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं आहे की, 11 लाखाची पैठणी 1 जणीला देण्यापेक्षा, 11 लाख गरीब महिलांना साधी साडी दिली तरी चांगलच होईल.तर दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, 11 लाखाची पैठणी नेसून कोणाला दाखवायची आहे..जिथं पैशाची गरज आहे तिथं वापरा. किती तरी गावात पाणी नसतं. लोक उन्हाळ्यात तडपडतात. ते सोडून पैठणीचं काय हे नवल...हे काय भलतच झी वाले कायपण दाखवतात. तर आणखी एकानं म्हटलं आहे की, कोणी रस्त्यानं जातानं चोरली तर..अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी शोला ट्रोल केलं आहे. होम मिनिस्टर हा शो यापूर्वी संध्याकाळी 6 ते 6.30 पर्यंत झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत होता.मात्र आता या नव्या पर्वात अनेक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. सोमवार ते शनिवार महामिनिस्टर आता एक तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
  या मनोरंजनासोबतच आता गृहिणींना तब्बल 11 लाखांची पैठणी देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला वर्गात मात्र आनंदाचे वातावरण आहे. नाशिकमध्ये आज उत्साहात महामिनिस्टर पर्वाची सुरूवात झाले. झिम्मा..फुगडीचे खेळ रंगले. नाशिकच्या लोकांनी  आदेश बांदेकर यांचे जोरदार स्वागत केलं.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या