टीआरपीच्या युद्धात कलर्स मराठी सरसावली, आणलाय महाएपिसोड्सचा रविवार

टीआरपीच्या युद्धात कलर्स मराठी सरसावली, आणलाय महाएपिसोड्सचा रविवार

टीआरपीच्या युद्धात आता कलर्स मराठीही सरसावलीय. म्हणूनच येत्या रविवारी चार मालिकांचे महाएपिसोड्स वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर : टीआरपीच्या युद्धात आता कलर्स मराठीही सरसावलीय. म्हणूनच येत्या रविवारी चार मालिकांचे महाएपिसोड्स वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत. लक्ष्मी सदैव मंगलम्, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, सुखाच्या सरींनी हे मन बावरे आणि घाडगे & सून, या मालिकांचे एका तासाचे महाएपिसोड प्रक्षेपित होणार आहेत.

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये लक्ष्मी द्विधा मनस्थितीमध्ये आहे. लक्ष्मी मल्हारच्या विचित्र वागण्यामुळे अस्वस्थ आहे. लक्ष्मी आणि अजिंक्य यांच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत.  हे आता लक्ष्मी आणि मल्हारला कळणार आहे. मल्हारला हे कळल्यावर तो नक्की काय करणार ? लक्ष्मी तिच्या सुखाचा विचार करणार की कर्तव्य पार पाडणार? हे बघणं रंजक असणार आहे.

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये सिध्दार्थला हळूहळू अनू आवडायला लागली आहे. अनूच्या छोट्या छोट्या आकांक्षा, स्वप्न सिध्दार्थ त्याच्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागला आहे. परंतु अनूला मात्र अजूनही हे सत्य माहिती नाही की हरीच सिध्दार्थ आहे. आता मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होत असताना अनूला लग्नस्थळ चालून आलं आहे. अनू त्या मुलाला भेटली आहे. परंतु सिध्दार्थला वाटत असलेली ही भावना तो अनूला सांगणार का? अनू सिध्दार्थला तिचा भूतकाळ सांगू शकेल का? हे या रविवारच्या भागामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

याच बरोबर घाडगे & सून मालिकेमध्ये घाडगे सदनमध्ये घराची विभागणी झाली आहे. अक्षय आणि कियारा घाडगे सदनमध्ये परतल्यानंतर अमृता घर सोडणार अस सांगते.  यामुळे अण्णा आणि माई अमृताला संपत्तीमधला काही हिस्सा द्यावा, असं म्हणाले.यावरूनच  भांडणाची एक ठिणगी पडते. त्यामुळे घराची विभागणी होते. इतकं वर्ष जपलेलं हे कुटुंब अचानक तुटलं हे माईना सहन होत नाही. आजवर घरामध्ये माईच्या शब्दाबाहेर कुणीच नव्हतं आणि आज सगळे घर तोडायला निघाले हे त्यांना बघवत नाही.  त्यामुळेच माई आणि अण्णा पूर्णपणे खचून जातात.  आता अमृता हा नात्यांचा गुंता कसा सोडवणार ? कसं घराला सावरणार ? अक्षय तिची मदत कशी करणार ? या सगळ्याचा उलगडा होणार.

बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये एवढ्या दिवसांपासून देवीच्या शोधात असलेल्या देवप्पाला अखेर सत्यवामध्ये देवीचं दर्शन होणार आहे. आता बाळू सत्यवाला देवप्पापासून कसं वाचवेल ? कसं दूर ठेवेल ? हे बघणं रंजक असणार आहे.

दर आठवड्याला टीआरपी रेटिंग समजतं. त्यात फक्क आणि फक्त झी मराठी असतं. त्यामुळेच कलर्स मराठीनं हा महाएपिसोड्सचा घाट घातलाय.

VIDEO : सायना नेहवालच्या लग्नात उर्वशी रौतेलानं केलं 'हे' खास काम

First published: December 20, 2018, 11:30 AM IST

ताज्या बातम्या