मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अभिनेत्री कंगना रणौतला काँग्रेसकडून धमक्या; बॉलिवूड क्वीनला पोलिसांकडून सुरक्षा

अभिनेत्री कंगना रणौतला काँग्रेसकडून धमक्या; बॉलिवूड क्वीनला पोलिसांकडून सुरक्षा

शेतकरी आंदोलनाला (Indian farmers protest) कंगना रणौत (kangana ranaut) विरोध करताना दिसत आहे. मात्र या विरोधामुळे काही राजकीय नेते तिच्यावर संतापले असून तिच्या धमकी दिली जाते आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई, 12 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती रोखठोकपणे आपल्या भूमिका मांडते. सध्या ती देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Indian farmers' protest) विरोध करताना दिसत आहे. मात्र या विरोधामुळे काही राजकीय नेते तिच्यावर संतापले असून तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण रोखण्याचा इशारा दिला. परिणामी मध्य प्रदेश सरकारकडून (Madhya Pradesh cops provide security) तिला कडक सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

कंगना धाकड हा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यात होणार आहे. परंतु तिने शेतकरी आंदोलनाविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे तेथील काँग्रेस कार्यकर्ते संतापले आहेत. “शेतकऱ्यांची माफी माग अन्यथा तुला धाकडचं चित्रीकरण करू देणार नाही” असा इशारा त्यांनी दिला.

शिवाय कंगनाने देखील तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. परिणामी मध्यप्रदेश गृहमंत्रालयातर्फे तिला विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे. येत्या 17 तारखेपासून सरणी या गावात धाकडचं चित्रीकरण सुरू होणार आहे. याठिकाणी कंगनाच्या सुरक्षेसाठी पोलीसदेखील उपस्थित राहतील.

हे वाचा - ‘मागणं नाहीच आहे तेच वाचवण्याचा प्रयत्न’; KRK ने उडवली मोदी सरकारची खिल्ली

कंगना रणौत यापूर्वी भोपाळमध्ये चित्रीकरण करत असतानादेखील एका राजकीय गटाने तिला विरोध केला होता. चित्रीकरणाच्या सेटवर जात या गटाने जोरदार घोषणाबाजी केली होती. तसंच कंगनाने भोपाळमधून परत जावं अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, कंगनाने अशा परिस्थितीही चित्रीकरण पूर्ण केलं.

First published:

Tags: Entertainment, Farmers protest, Kangana ranaut