माधुरी करणार मराठी सिनेमाची निर्मिती

माधुरी करणार मराठी सिनेमाची निर्मिती

स्वप्नील जयकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून योगेश जोशी हे या सिनेमाचे लेखक असतील.

  • Share this:

23 ऑगस्ट: जगभरातील प्रेक्षकांना मोहिनी घालणारी 'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने लवकरच निर्मिती क्षेत्रात उतरते आहे. आनंदाची गोष्ट अशी सिनेमा मराठी असणार आहे.

सध्या बॉलिवूडचे अनेक तारे मराठी सिनेमाची निर्मिती करत आहेत. रितेश देशमुख, प्रियांका  चोप्रा, जॉन अब्राहम, अजय देवगण यांच्यानंतर आता  माधुरीसुद्धा मराठी सिनेमाची निर्मिती करताना दिसेल. स्वप्नील जयकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून योगेश जोशी हे या सिनेमाचे लेखक असतील. शूटिंग या वर्षाच्या शेवटी सुरु होणार आहे. कलाकारांची नावं मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहेत. माधुरी स्वत: या सिनेमात झळकणार का हेही अजून कळायचं आहे.

माधुरीच्या या मराठी सिनेमाबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी माधुरी आता सिनेमाची निर्मिती कशी करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 09:51 AM IST

ताज्या बातम्या