S M L
Football World Cup 2018

अखेरच्या सिनेमात श्रीदेवींच्या जागी झळकणार 'ही' अभिनेत्री

श्रीदेवींच्या अचानक जाण्याने त्यांचा शेवटचा सिनेमा अर्धवटच राहिला. त्यांच्या याच शेवटच्या सिनेमातली त्यांची जागा आता धकधक गर्लने घेतली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 12, 2018 02:24 PM IST

अखेरच्या सिनेमात श्रीदेवींच्या जागी झळकणार 'ही' अभिनेत्री

12 मार्च : श्रीदेवींच्या अचानक जाण्याने त्यांचा शेवटचा सिनेमा अर्धवटच राहिला. त्यांच्या याच शेवटच्या सिनेमातली त्यांची जागा आता धकधक गर्लने घेतली आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या या सिनेमामध्ये काम करण्यासाठी श्रीदेवा फार उत्सुक होत्या. पण त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे त्यांची भूमिका आता अभिनेत्री माधुरी दीक्षितला देण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार श्रीदेवींच्या 'शिद्दत' या आगामी सिनेमात माधुरी दीक्षित झळकणार असल्याच्या चर्चा आहेत.

मी या सिनेमात काम केलं तर माझ्या कामातून मी श्रीदेवीला आठवेन आणि हा सिनेमा चांगला झालाच तर त्यांच्यासाठी ही आठवणीतली श्रध्दांजली असेल असं माधुरी दीक्षित म्हणाली आहे.

पण श्रीदेवी यांच्या जाण्यानंतर प्रथेनुसार अनेक विधी राहिल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्या सगळ्या धार्मिक विधी पुर्ण होणार नाही. तोपर्यंत या सिनेमाची शूटिंग सुरू होणार नाही असं धर्मा प्रॉडक्शनकडून सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2018 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close