VIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'

VIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'

नुकतीच माधुरी सुपर डान्सर चॅप्टर 3च्या सेटवर आली होती. त्यावेळी शिल्पा शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांनी तुफान डान्स केला.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : माधुरी दीक्षित नेहमीच बाॅलिवूडची प्रेरणा आहे. अनेक अभिनेत्री माधुरीपासून स्फूर्ती घेतायत. त्यात एक आहे शिल्पा शेट्टी. नुकतीच माधुरी सुपर डान्सर चॅप्टर 3च्या सेटवर आली होती. त्यावेळी शिल्पा शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांनी तुफान डान्स केला.
 

View this post on Instagram
 

Ho jaayiye taiyaar paas aa rahi hai woh raat, jahan hoga Anil Kapoor aur Madhuri Dixit Nene ke saath Total Dhamaal! Dekhiye #SuperDancerChapter3, iss weekend raat 8 baje. @madhuridixitnene @anilskapoor @TheShilpaShetty @geeta_kapurofficial @anuragsbasu @rithvik_d @iamparitoshtripathi @lotus_herbals @sarwangourav @saksham.entertainer @tejas_being_legend @jay_chauhan_jojo @rupsa_04 @pritamsd3 @ridesh_superdancer3 @avasthathapa @jayshreegogoiofficial @Upratik2390 @sanamjohar @tusharshetty95 @Zindarobot @Nishantbhat86 @vivek_chachere @vabs_perfectentertainer @anu_iyengar @aishwarya.rk92 @shivanipatel_official @aryan_patra


A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial) on

सुपर डान्सर चॅप्टर 3च्या सेटवर सगळ्यांनी शिल्पाला माधुरीबरोबर डान्स करायला सांगितलं. त्यावेळी शिल्पा म्हणाली, मी अनेकांबरोबर जान्स केलाय. अगदी डान्स मास्टर प्रभुदेवाबरोबरही डान्स केलाय. पण माधुरीसोबत डान्स करताना टेंशन येतं.
शिल्पा म्हणाली, मी माधुरीची फॅन आहे. मोठ्यापणी आपण माधुरीसारखं बनावं असं मला माझ्या लहानपणी वाटायचं. मला माधुरीचं स्माइल खूप आवडतं.
दोघींनी घागरा आणि मै आयी हूँ युपी बिहार लुटने या गाण्यांवर जोरदार डान्स केला. त्या दोघींचा एकत्र डान्स पाहून सगळेच मंत्रमुग्ध झाले.

माधुरी दीक्षितनंही शिल्पा शेट्टीचं खूप कौतुक केलंय.


सोनम कपूरनं पुन्हा एकदा बदललं नाव, कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2019 06:14 PM IST

ताज्या बातम्या