Home /News /entertainment /

सोनं चोरीची घटना पाहून माधुरी दीक्षितला हसू आवरेना, शेअर केला VIDEO

सोनं चोरीची घटना पाहून माधुरी दीक्षितला हसू आवरेना, शेअर केला VIDEO

बॉलिवूडच्या धकधक गर्लला चोरीची घटना पाहून हसू आवरेना झालं . सोशल मीडियावर माधुरीनं (Madhuri Dixit) चोरीच्या या घटनेचा व्हिडीओदेखील (Video) शेअर केला आहे.

    मुंबई 24 मार्च : चोरीची एखादी घटना म्हटलं, की आपल्या चेहऱ्यावरील हावभाव काय असू शकतात? चोरीची एखादी घटना पाहून कोणी हसायला लागलं तर? बॉलिवूडच्या धकधक गर्लला मात्र चोरीची घटना पाहून हसू आवरेना. सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणाऱ्या माधुरीनं (Madhuri Dixit) चोरीच्या या घटनेचा व्हिडीओदेखील (Video) शेअर केला आहे. बहुतेक वेळा आपल्या डान्सचे किंवा स्वतःचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या माधुरीनं यावेळी शेअर केलेल्या वेगळ्या व्हिडीओनं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. माधुरीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही मुंग्या एक सोन्याची चैन घेऊन जात असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे, शतकातील सर्वात मोठी चोरी. माधुरीनं हाच व्हिडीओ शेअर करत यासोबत हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral on Social Media) होत असल्याचं दिसत आहे. माधुरी सध्या डान्स दीवाने ३ मध्ये जज आहे. नुकतंच तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. यात ती वहिदा रहमान यांच्यासोबत डान्स एक्सप्रेशन देताना दिसत होती. माधुरी आणि वहीदा रहमान यांनी पान खाए सइंया हमार या गाण्यावर हे एक्सप्रेशन दिले होते. वहीदा रहमान डान्स दीवानेमध्ये पाहुण्या म्हणून पोहोचल्या होत्या. हा शो २७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. कामाबद्दल बोलायचं झाल्यास माधुरीनं आजा नचले सिनेमातून चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं आहे. याशिवाय यानंतर अभिनेत्रीनं डेढ़ इश्किया, बॉम्बे टॉकीज, गुलाब गँग, कलंक आणि टोटल धमाल यासारख्या अनेक सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. आता माधुरी डिजीटल पदार्पणासाठीही सज्ज झाली असून लवकरच ती फाइंडिंग अनामिकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केलं जाणार असून यात संजय कपूरही महत्तवाच्या भूमिकेत दिसणार आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Madhuri dixit, Video viral

    पुढील बातम्या