मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

माधुरी दिक्षितच्या मुलाने का वाढवले होते केस, Video शेअर करत अभिनेत्रीचा खुलासा

माधुरी दिक्षितच्या मुलाने का वाढवले होते केस, Video शेअर करत अभिनेत्रीचा खुलासा

Madhuri Dixit

Madhuri Dixit

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत माधुरीचा लहान मुलगा रियान वाढवलेले केस कट करताना दिसत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 8 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. माधुरी सोशल मीडियावर सक्रिय राहत नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. दरम्यान, तिने एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये तिचा मुलागा रियान (Ryan) दिसत आहे. तो त्याचे वाढवलेले केस कापत असल्याचे दिसत आहे. त्याचे इतके मोठे केस पाहता माधुरीच्या चाहत्यांना प्रश्न पडला. पण माधुरीने व्हिडीओ शेअर करत सर्वांना गर्व वाटेल अशी माहिती मुलागा रियानसंदर्भात दिली आहे.

माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत माधुरीचा लहान मुलगा रियान आहे. या व्हिडीओत रियान त्याचे केस कापताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत “सगळे हीरो टोपी घालत नाहीत…पण माझा हीरो घालतो. राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त, मला खरोखर काही तरी खास सांगायच आहे”, असे माधुरी म्हणाली.

तसेच ती पुढे म्हणाली, रायनला खूप वाईट वाटलं. त्यांचे काही सहकारी जे कर्करोगाशी आणि केमोथेरपीशी झुंज देत आहेत. त्या लोकांनाही केस गळण्याचं खूप दुःख झालं. माझ्या मुलाने भूमिका घेतली आणि त्याच्या चाइल्ड कॅन्सर सोसायटीला देणगी देण्याचा निर्णय घेतला, पालक म्हणून आम्ही त्याच्या निर्णयाने थक्क झालो असल्याचे माधुरीने म्हटले आहे.

माधुरीने खुलासा केला आहे की, मुलाने कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी दोन वर्षांपासून केस कापले नाहीत. तिने लिहिलं की, “मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्या लांबीपर्यंत केस वाढवण्यासाठी रायनला 2 वर्षे लागतील आणि ही शेवटची पायरी होती. आज आम्हाला खूप अभिमान वाटतोय.” यासोबतच माधुरीने हा व्हिडिओ तिच्या पतीलाही टॅग केला आहे. माधुरीने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल होत असून यानंतर रायनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

First published:

Tags: Entertainment, Madhuri dixit