मुंबई, 21 डिसेंबर : 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित-नेने आता पूर्वीइतकी सिनेसृष्टीत सक्रिय नसली तरी तिचे लाखो चाहते तिची बित्तंबातमी ठेवत असतात. सोशल मिडीयावर तिला फॉलो करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसते. Instagram वरही माधुरीचा जलवा कायम आहे.
'आयुष्यात आणखी काय आनंद पाहिजे? चेहऱ्यावर सूर्यप्रकाश आणि आणि मंद वाऱ्यावर भुरभुरणारे केस आहेत...' अशी कॅप्शन देत माधुरीने तिचा एक ताजा टवटवीत फोटो तिच्या इन्स्टा पेजवर शेअर केला आणि तिच्या लाखो फॅन्सच्या त्यावर उड्या पडल्या.
215 लाख फॉलोअर्स असणारी माधुरी आपले खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातले निवडक क्षण इथे शेअर करत असते. तिनं आपला एक सुरेख फोटो पोस्ट केला आहे. यात तिनं मरून रंगाचा फ्रॉक घातला असून दोन्ही हात कमरेवर ठेवत स्टायलिश पोज दिली आहे. याच रंगाची लिपस्टिक आणि हलकासा मेकअप तिला खुलवतो आहे. हातात अंगठी आणि साधेसे कानातले. तिच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असलेलं तिचं हसूही या फोटोत उठून दिसत आहे.
View this post on Instagram
माधुरीनं जपलेला फिटनेसही यात जाणवल्यावाचून राहत नाही. 'त्वचेवर उन्हं आणि केसांमध्ये खेळणारा वारा... जीवनातले साधे आनंद' अशी कॅप्शनही तिनं या फोटोला दिली आहे. तिच्या या रुपाला दोन तासातच तब्बल 3,95,869 इतके लाइक्स मिळाले असून 3,235 लोकांनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
आता माधुरी पूर्वीइतके सिनेमे करत नसली तरी ती सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. नवरा राम नेने आणि दोन्ही मुलांसोबतचे फोटोजही ती सातत्यानं शेअर करते. शिवाय ती सतत आपल्या चाहत्यांना नृत्य करण्यासाठी प्रोत्साहितही करत असते.
गेल्यावर्षी माधुरीचे 'कलंक' आणि 'टोटल धमाल' हे दोन सिनेमे आले होते. दोन्हीमधल्या तिच्या भूमिका रसिकांना अतिशय आवडल्या. याशिवाय माधुरीनं डान्स दिवाने या रिएलिटी शोची परिक्षक म्हणूनही काम केलं.