मुंबई, 29 जून- बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने सध्या आपल्या दोन्ही मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत काही दिवसांपूर्वी माधुरीने सोशल मीडियावर सुट्ट्यांचे काही फोटो शेअर केले होते. सध्या ती नेने मुलं रेयान आणि एरिनसोबत अमेरिकेत आहेत. इथे ती मोठा मुलगा रेयानसाठी चांगलं कॉलेज शोधत आहे.
Loving NYC. Just finished the recce for Columbia and NYU with the boys. Amazing! pic.twitter.com/UcfYq49PYw
— Dr. Shriram Nene (@DoctorNene) June 25, 2019
विराटच्या फेवरेट स्टार क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची मुलगी
माधुरीच्या मोठ्या मुलाचं शालेय शिक्षण लवकरच संपणार आहे. त्यामुळे पुढं शिक्षण त्याने परदेशात घ्यावं अशी माधुरी आणि श्रीराम दोघांचीही इच्छा आहे. त्यामुळेच संपूर्ण कुटुंब न्यूयॉर्कमध्ये चांगल्या कॉलेजच्या शोधात आहेत. श्रीराम नेने यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून काही फोटो शेअर केले. यात ते कोलंबिया युनिर्व्हसिटी आणि न्यूयॉर्क युनिर्व्हसिटीत जाताना दिसत आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, ‘मुलांसोबत कोलंबिया युनिर्व्हसिटी आणि न्यूयॉर्क युनिर्व्हसिटीचा शोध संपला.’
Loving NYC! Now the college recce... last week the competition and the week before Italy. Tough job... pic.twitter.com/LYxWs3ykhH
— Dr. Shriram Nene (@DoctorNene) June 24, 2019
या पाच कारणांमुळे कबीर सिंगचा केला जातोय विरोध
माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, याच वर्षी तिचा कलंक सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्तही होते. अभिषेक वर्मन दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती करण जोहरने केली होती. मल्टिस्टारर असा हा सिनेमा प्रेक्षकांना फारसा पसंत पडला नाही.
करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा