मुंबई 30 मे : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) तिच्या मुलाचं फोटो शेअर करत अभिनंदन केलं आहे. माधुरीचा मोठा मुलगा अरिन (Arin Nene) हायस्कूल ग्रॅज्युएट झाला आहे. त्यामुळे माधुरी आणि पती श्रीराम नेनेंसाठी (Shriram Nene) ही अभिमानाची गोष्ट आहे. याचसोबत माधुरीने यावर्षी ग्रॅज्युएट होणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच अभिनंदन केलं आहे.
माधुरीने एक कुटुंबासोबत फोटो शेअर केला आहे. ज्यात स्वतः माधुरी, पती श्रीराम नेने, मुलगा अरिन आमि लहान मुलगा रयान आहेत. तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे, ‘राम आणि माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की अरिन हायस्कूल ग्रॅज्युएट झाला आहे. अभिनंदन अरिन आणि 2021चा संपूर्ण वर्ग. हे वर्ष सगळ्यांसाठीच अत्यंत कठीण होत पण तुमच्या मेहनतीला, चिकाटीला, जिद्दीला आमचा सलाम.’
A proud moment for Ram and I, as Arin graduates from high school with flying colors Congratulations Arin and to the graduating class of 2021. pic.twitter.com/2THE7VH3d4
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) May 30, 2021
पुढच्या ट्वीटमध्ये तिने लिहिलं आहे, टतुमच्या स्वप्नांची कास धरा. लक्षात ठेवा एक दिवस तुमच्यामध्ये बदल घडवण्याची ताकद येणार आहे. तिचा योग्य वापर करा. सगळ्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.’
‘पद्मावतच्या वेळी काय झालं होतं आठवा’; अक्षयच्या ‘पृथ्वीराज’ला करणी सेनेचा इशारा
याआधी माधुरीचे पती श्रीराम नेने यांनी शनिवारी ट्वीट करत पर्यटन मंत्री आदीत्य ठाकरे (Aditya Thackrey) यांचे आभार मानले होते. व जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू केल्याबंद्दल हे आभार त्यांनी मानले होते. तर माधुरीचा मुलगा अरिन हा पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे.
Many thanks. As a parent of a graduating senior who is going abroad, it is much appreciated. They need the vaccines to be able to go to college. https://t.co/MqnjhHrZjO
— Dr. Shriram Nene (@DoctorNene) May 29, 2021
सध्या माधुरी कलर्स टीव्ही (Colors Tv) वरील 'डान्स दिवाने' (Dnace Deevane) या शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिने यो शो मधून ब्रेक घेतला होता पण आता ती परतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Madhuri dixit