मुंबई, 15 मे : अभिनय, अदा आणि नृत्य यामुळे गेली अनेक दशकं माधुरी दिक्षीतने (Madhuri Dixit Nene) बॉलिवूडवर राज्य केलं. अनेक अभिनेत्रींनी तिला फॉलो केलं पण आजही माधुरीचे चाहते 'तिची सर कुणालाच नाही' असंच म्हणतात. आज माधुरी दिक्षीतचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव अद्यापही सुरू आहे. दरम्यान माधुरीने तिच्या चाहत्यांना देखील एकदम खास असं रिटर्न गिफ्ट दिलं आहे. ती आता काहीशा वेगळ्या ढंगात आपल्याला दिसणार आहे. अभिनेत्री, डान्सर ते रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक यानंतर आता तिला एका वेगळ्या भूमिकेत पाहणार आहोत. तिच्या प्रतिभेचा नवा पैलू उलगडताना पाहायला मिळणार आहे.
(हे वाचा-आईच्या त्या शब्दांनी मुलाखत सुरू असताना रणवीरला कोसळलं रडू, भावूक VIDEO व्हायरल)
माधुरी दिक्षीत चक्क आता एक गाणं घेऊन प्रेक्षकांंच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती नृत्य किंवा अभिनय करणार नसून ती गायकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. तिने आय फॉर इंडिया (I For India) या लॉकडाऊनमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यासाठी पार पडलेल्या कॉन्सर्टमध्ये Ed Sheeran चं 'परफेक्ट' हे गाणं गायली होती. त्यावेळी तिच्या गाण्याचे सर्वांनी कौतुक केल्यानंतर आता माधुरी गाण्याकडे गांभीर्याने पाहू लागली आहे. माधुरी आता तिचं स्वत:चं इंग्रजी गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Thanks for all the good wishes and birthday love! Wanted to give some love back to you. Sharing an exclusive preview of my first ever single. Will share the song soon. It's called Candle and it's about hope, something we need in large supply right now. pic.twitter.com/gmSTmt3KrJ
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) May 15, 2020
दरम्यान माधुरीने तिच्या ट्विटर अकाउंटवरून गाण्याचा टीझर शेअर केल्यानंतर त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. माधुरीच्या या नव्या कलाकृतीसाठी तिचे फॅन्स खूप उत्सुक आहेत.