बॉलिवुडची माधुरी दीक्षित म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी 'धक-धक' गर्ल फक्त अभिनयानेच नाही तर तिच्या हटके डान्सने सगळ्यांचीच मन जिंकते. आताही माधुरीचा असाच एक सुपर डान्स व्हायरल झाला आहे. 51 वर्षांची माधुरीने 1990ला तिच्या 'शानदार' या सिनेमातील प्रसिद्ध गाण 'तम्मा तम्मा'वर डान्स करून सगळ्यांच्याच हृदयात जागा मिळवली होती. पण तिच्या वयाची जराशीही झलक तिच्या या डान्समधून दिसत नाही आहे.