मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Madhuri Dixit: हो ही आपली माधुरीच; पण या क्यूट बॉयला ओळखताल का?

Madhuri Dixit: हो ही आपली माधुरीच; पण या क्यूट बॉयला ओळखताल का?

अवघ्या भारतीयांच्या मनावर रुंजी घालणारी मराठमोळी मुलगी माधुरी दीक्षितचा एक जुना फोटो सध्या बराच viral होत आहे.

अवघ्या भारतीयांच्या मनावर रुंजी घालणारी मराठमोळी मुलगी माधुरी दीक्षितचा एक जुना फोटो सध्या बराच viral होत आहे.

अवघ्या भारतीयांच्या मनावर रुंजी घालणारी मराठमोळी मुलगी माधुरी दीक्षितचा एक जुना फोटो सध्या बराच viral होत आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 02 ऑगस्ट: भारताची धकधक गर्ल म्हणून ओळख असणारी माधुरी दिक्षित हिची चर्चा कधीच थांबत नाही. माधुरीने गेली अनेकवर्ष आपल्या निरागस सौदर्यांने आणि तितक्याच ताकदीच्या अभिनयाने आपलं स्थान कायम ठेवलं आहे. आजही अनेकांच्या मनाचा ठाव घेणारी माधुरी लहानपणीही बरीच क्युट आणि गोड दिसायची. तिचा एक लहानपणीचा (madhuri dixit nene childhood pic) फोटो सध्या सोशल मीडियावर बराच viral होत आहे. आणि त्याचसोबत माधुरीसह फोटोमध्ये असणाऱ्या या गोड मुलाची सुद्धा चर्चा होत आहे. माधुरीच्या या क्युट लहानपणीच्या व्हर्जनसोबत दिसणारा हा लहान मुलगा म्हणजे तिचे पती श्रीराम नेने आहेत. माधुरीचे अहो म्हणजे श्रीराम नेने यांनी नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता ज्यात त्या दोघांचेही लहानपणीचे फोटो दिसून येत आहे. श्रीराम यांनी फोटोला कॅप्शन देत लिहिलं आहे, “कोणे एकेकाळी एका राजकुमाराला त्याची राजकन्या मिळाली आणि एक इतिहास घडला.” खरोखरच श्रीराम यांच्या आयुष्यात असलेली ही राजकन्या हाती लागावी अशी इच्छा प्रत्येकच तरुणाची होती यात वाद नाहीच. माधुरीच्या आयुष्यात असलेला एक राजबिंडा मुलगाच लहानपणी एवढा क्युट दिसायचा यावर अनेकांना विश्वास ठेवणं कठीण जात आहे. श्रीराम यांच्या फोटोला चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करून त्याचं कौतुक केलं आहे.
एक युजर लिहितो, “खरोखरच तुम्ही या भूतलावरील सगळ्यात सुंदर कपल असल्याचा किताब मिळवण्यासाठी पात्र आहेत.” तर दुसरा एक युजर लिहितो, “हे किती सुंदर आहे. ही पोस्ट बघून आनंद झाला. असा पोस्ट प्लिज पुन्हा पुन्हा करा.” एकूणच चाहत्यांना धकधक गर्ल आणि तिच्या या प्रिन्स चार्मिंगचा अंदाज भलताच आवडल्याचं समोर येत आहे.
श्रीराम हे नेहमीच माधुरीसोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आणि माधुरी सुद्धा आपल्या सोशल मीडियावर पतीसोबतच्या क्युट मोमेंट्स शेअर करताना दिसते. माधुरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या रील्सना सुद्धा खूप सुंदर प्रतिसाद चाहते देताना दिसतात.
First published:

Tags: Bollywood actress, Madhuri dixit, Marathi actress, Wife and husband

पुढील बातम्या