मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Madhuri Dixit Botox Surgery : काय सांगता माधुरीनं केली चेहऱ्याची सर्जरी? Video होतोय व्हायरल, चाहते हैराण

Madhuri Dixit Botox Surgery : काय सांगता माधुरीनं केली चेहऱ्याची सर्जरी? Video होतोय व्हायरल, चाहते हैराण

माधुरी दीक्षित बोटॉक्स सर्जरी

माधुरी दीक्षित बोटॉक्स सर्जरी

बॉलिवूडमध्ये सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची सर्जरी करण्याचं फ्याड फार वर्षांपासून आहे. आता तर अभिनेत्री माधुरी दीक्षितनंही चेहऱ्याची सर्जरी केल्याचं म्हटलं जात आहे. माधुरीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  27 सप्टेंबर: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षीत सध्या 'झलक दिखला जा' 10 या शोमध्ये परीक्षक म्हणून काम करतेय. शोमध्ये माधुरी इतर कलाकारांपेक्षा हटके स्टायलिंग करून लक्ष वेधून घेतेय. नोरा फतेही आणि माधुरी यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळतेय.  या विकेंडच्या एपिसोडमध्ये मात्र माधुरीला पाहून सगळेच हैराण झाले. माधुरी छान तयार होऊन सेट पोहोचली मात्र तिला पाहून सगळेच हैराण झालेत. माधुरीनं सी ग्रीन प्रिटेंड लेहंगा त्यावर मॅचिंग झुमके आणि बांगड्या कॅरी करत एंट्री केली मात्र अभिनेत्रीचा चेहरा पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

झलक दिखलाजाच्या मंचावरील माधुरीचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, व्हिडीओमध्ये माधुरीच्या चेहऱ्याला सुज आल्यासारखं वाटत आहे. तिच्या चेहऱ्यावरील नेहमीप्रमाणे चमक दिसत नाहीये. तसंच तिच्या स्माइलमध्येही मोठा फरक जाणवतो आहे.  फोटो क्लिक करताना माधुरी फोटोग्राफर्सना थॅक्यू म्हणताना स्माइल केली तेव्हा ती स्माइल आर्टिफिशअल आणि फेक वाटत होती असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - Jhalak Dikhla Ja: 20 वर्षानंतर माधुरीने 'डोला रे डोला'या आयकॉनिक गाण्यावर केला डान्स, पाहा VIDEO

त्याचप्रमाणे माधुरीनं सुंदर दिसण्यासाठी फिलर किंवा बोटॉक्स केल्याचं म्हटलं जात आहे.  बोटॉक्स ट्रिटमेंट घेतली आहे का? असे प्रश्न माधुरीला विचारण्यात येत आहेत.  त्याचप्रमाणे एका युझरनं म्हटलंय, 'असं वाटतं आहे की माधुरीनं तिच्या स्माइलचं काही तरी केलं आहे. तिची स्माइल नॅचरल वाटत नाही'. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये माधुरीची स्किनमध्ये फार टाइट दिसत आहे. याचाच अर्थ तिनं बोटॉक्स केलं आहे असं कळून येत आहे.

बोटॉक्स ट्रिटमेंट काय असते?

बोटॉक्स ट्रिटमेंट आजकाल सर्रासपणे केली जाते. डोळ्यांखालची काळी वर्तुळ लपवण्यासाठी त्याचप्रमाणे स्किन टाइट करण्यासाठी बोटॉक्स सारख्या ट्रिटमेंट घेतल्या जातात. स्किनप्रमाणे केसांसाठीही बोटॉक्स ट्रिटमेंट केली जाते.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची अशाप्रकारची सर्जरी करतात. यासाठी लोखो रुपयांचा खर्च करावा लागतो.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News