माधुरी दीक्षितनं तिच्या पहिल्या मराठी सिनेमाचा फर्स्ट लूक केला शेअर

माधुरी दीक्षितनं तिच्या पहिल्या मराठी सिनेमाचा फर्स्ट लूक केला शेअर

मकर संक्रांतीनिमित्तानं अभिनेत्री माधुरी दीक्षितनं मराठीत ट्विट करून शुभेच्छा दिल्यात. त्याचसोबत तिच्या पहिल्या मराठी सिनेमाचं बकेटलिस्टचं पोस्टर तिनं शेअर केलंय.

  • Share this:

14 जानेवारी : मकर संक्रांतीनिमित्तानं अभिनेत्री माधुरी दीक्षितनं मराठीत ट्विट करून शुभेच्छा दिल्यात. त्याचसोबत तिच्या पहिल्या मराठी सिनेमाचं बकेटलिस्टचं पोस्टर तिनं शेअर केलंय. 'बकेट लिस्ट...माझी,तुमची... आपल्या सगळ्यांची तिळगूळ घ्या, गोड गोड बोला.' असं तिनं ट्विट केलंय.

माधुरी दीक्षितच्या या पहिल्या मराठी सिनेमाचं शूटिंग सुरू झालंय. त्याचं नाव आता समोर आलंय. तेजस प्रभा विजय देऊस्कर सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. माधुरी या सिनेमात गृहिणीची भूमिका करतेय. माधुरी म्हणतेय, ' ही कथा प्रत्येक घरातली आहे. प्रत्येकाला ती आपली वाटेल, म्हणून हा सिनेमा मी निवडलाय. '

माधुरी दीक्षितनं आतापर्यंत जवळजवळ 75 सिनेमे केलेत. पण मराठी सिनेमा पहिलाच. याआधी तिला श्यामची आई सिनेमासाठीही विचारलं गेलं होतं. सध्या माधुरी शूटिंगमध्ये बिझी आहे. शूटिंगचा काही भाग अलिबागमध्येही शूट झालाय. मकर संक्रांतीनिमित्तानं माधुरीनं सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आणलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2018 02:05 PM IST

ताज्या बातम्या