ही तर माझ्याच कर्माची फळं - माधुरी दीक्षित

नुकत्याच एका रिअॅलिटी शोमध्ये माधुरीनं स्वत:च्या आयुष्यातली रिअॅलिटी दाखवली. ती सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2018 01:15 PM IST

ही तर माझ्याच कर्माची फळं - माधुरी दीक्षित

मुंबई, ०९ जुलै : माधुरी दीक्षित सध्या आयुष्याची सेकंड इनिंग खेळतेय. मोजके सिनेमे आणि रिअॅलिटी शोमध्ये जज अशा भूमिका ती सध्या पार पाडतेय. नुकत्याच एका रिअॅलिटी शोमध्ये माधुरीनं स्वत:च्या आयुष्यातली रिअॅलिटी दाखवली. ती सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाली जशी करणी तशी भरणी. माझ्याच कर्माची फळं मला मिळतायत.

झालं असं की 'डान्स दिवाने' या रिअॅलिटी शोची माधुरी जज आहे. किशन नावाच्या एक स्पर्धकानं खूप चांगला परफाॅर्मन्स केला. त्यावेळी तो म्हणाला, मी माझा हा परफाॅर्मन्स माझ्या आईला समर्पित करतोय. मला खूप पश्चात्ताप होतोय की मी माझ्या आईला महत्त्वच दिलं नाही. तिचे फोन उचलले नाहीत. तिचं ऐकलं नाही.

हेही वाचा

हृतिक रोशननं भन्साळींचा सिनेमा करायला का दिला नकार?

प्रियांका करतेय बाॅलिवूडचा दुसरा सिनेमा, 'या' अभिनेत्याबरोबर करणार काम

Loading...

'संजू' सिनेमासाठी संजय दत्तनं घेतले 'इतके' कोटी!

त्यानंतर माधुरीनं तिचे अनुभव शेअर केले. ती म्हणाली, 'माझी मुलंही माझं ऐकत नाहीत. मी हाक मारली तरी लक्ष देत नाहीत.' पण ती पुढे हेही म्हणाली, ' मीही माझ्या आईशी असंच वागायचे. तिचं काही ऐकायचे नाही. पण हे बरोबर नाही. असं कोणी वागू नये. तेव्हा माझ्या आईला काय वाटायचं हे आता मला कळतंय.

१९९९मध्ये माधुरीचं लग्न श्रीराम नेनेंशी झालं. आणि बरीच वर्ष ती अमेरिकेत सेटल होती. नुकताच तिचा बकेट लिस्ट रिलीज झाला. टोटल धमाल आणि कलंक या सिनेमांत ती काम करतेय. त्याचं शूट सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 01:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...