माधुरी दीक्षितच्या हस्ते धनंजय दातारांच्या 'मसाला किंग'चं प्रकाशन

माधुरी दीक्षितच्या हस्ते धनंजय दातारांच्या 'मसाला किंग'चं प्रकाशन

मुंबईतल्या रॉयल ओपेरा हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमात माधुरीने धनंजय दातार यांनी केलेल्या प्रगतीचं तोंड भरून कौतुक केलं.

  • Share this:

मुंबई, 07 फेब्रुवारी : दुबईस्थित व्यावसायिक आणि अल अदिल कंपनीचे मालक धनंजय दातार यांच्या मसाला किंग या पुस्तकाचं धक धक गर्ल माधुरी दीक्षितच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. मुंबईतल्या रॉयल ओपेरा हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमात माधुरीने धनंजय दातार यांनी केलेल्या प्रगतीचं तोंड भरून कौतुक केलं. अमरावतीतल्या छोट्याशा गावातून आयुष्याची सुरूवात करणाऱ्या दातार यांनी 35 वर्षात दुबईत तब्बल 39 दुकानं उघडली. भारत आणि परदेशातील तब्बल 109 प्रॉडक्ट्स या दुकानांमधून आज विकण्यात येतात.

त्यांचा व्यवसाय, तो उभा करताना त्यांना आलेल्या अडचणी, त्यातून त्यांनी केलेलं मार्गक्रमण आणि अपयशातून मिळालेली शिकवण हे सारं या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक तरूणासाठी हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

First published: February 7, 2018, 11:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading