माधुरी दीक्षितचा सिनेमा करण जोहरच्या वाढदिवसाला रिलीज

माधुरी दीक्षितचा सिनेमा करण जोहरच्या वाढदिवसाला रिलीज

तो प्रेझेंट करतोय करण जोहर. करण जोहरचा वाढदिवसही 25 मेला असतो.

  • Share this:

03 एप्रिल : माधुरी दीक्षितच्या बकेट लिस्ट सिनेमाची रिलीज डेट ठरली एकदाची! येत्या 25 मे रोजी हा सिनेमा रिलीज होतोय. आणि तो प्रेझेंट करतोय करण जोहर. करण जोहरचा वाढदिवसही 25 मेला असतो.

या सिनेमात माधुरी मधुरा सानेच्या भूमिकेत आहे. सानेंच्या घरची ही सून, तिच्या आयुष्यात एक व्यक्ती येते आणि मधुरा बदलून जाते. तेजस देऊस्करनं सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सुमित राघवन, वंदना गुप्ते, रेशम टिपणीस असे कलाकार सिनेमात आहेत.

माधुरीचा पहिला मराठी सिनेमा असल्यानं सगळ्यांनाच उत्सुकता आहे. बकेट लिस्ट सिनेप्रेमींसाठी नक्कीच छान ट्रीट असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2018 04:09 PM IST

ताज्या बातम्या