23 वर्षांनी माधुरी दीक्षित-रेणुका शहाणे सिनेमात एकत्र

23 वर्षांनी माधुरी दीक्षित-रेणुका शहाणे सिनेमात एकत्र

माधुरी दीक्षित मराठी सिनेमात काम करणार ही बातमी आता जुनी झालीय. पण याच सिनेमातून 'हम आपके है कौन' सिनेमातल्या निशा आणि पूजा यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.

  • Share this:

15 डिसेंबर : माधुरी दीक्षित मराठी सिनेमात काम करणार ही बातमी आता जुनी झालीय. पण याच सिनेमातून 'हम आपके है कौन' सिनेमातल्या निशा आणि पूजा यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. बरोबर ओळखलंत, माधुरी आणि रेणुका शहाणे एकत्र या माधुरीच्या मराठी सिनेमात दिसणार आहेत. रेणुकानं तसं ट्विटही केलंय. 23 वर्षांनी दोघी एकत्र येतायत.

या सिनेमात त्या बहिणी नसतील. सिनेमाचा दिग्दर्शक तेजस देवस्करनं रेणुकाला या सिनेमाविषयी सांगितलं. तेव्हा त्यात माधुरी आहे कळल्यावर रेणुकानं लगेचंच होकार दिला. सिनेमाचं शूटिंग मुंबईत सुरू आहे. पुणे आणि परदेशातही याचं शूटिंग होणार आहे.

रेणुका आणि माधुरी दोघांचं स्माइल हा मोठा युएसपी. प्रेक्षकांसाठी ही खास ट्रीट ठरेल यात शंका नाही.

First published: December 15, 2017, 5:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading