16 वर्षांनी माधुरी दीक्षित-अनिल कपूर करणार 'टोटल धमाल'!

16 वर्षांनी माधुरी दीक्षित-अनिल कपूर करणार 'टोटल धमाल'!

इंद्रकुमार दिग्दर्शित 'टोटल धमाल' या सिनेमात दोघंही काम करतायत. सिनेमा काॅमेडी आहे. शूटिंग येत्या जानेवारीपासून सुरू होतंय.

  • Share this:

13 नोव्हेंबर : तुम्हाला परिंदा, राम लखन,  पुकार, बेटा सिनेमे आठवत असतील? हे सिनेमे विसरणंच शक्य नाही. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या केमिस्ट्रीनं या सिनेमांना चार चांद लागले होते. या दोघांच्या जोडीनं अनेक गाणी अजरामर केलीयत. अगदी धक धक करने लगा असो नाहीतर  तुमसे मिल कर.

हे सगळं आठवण्याचं कारण असं की आता पुन्हा एकदा अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही जोडी टोटल धमाल करायला येतेय. तेही 16 वर्षांनी.

इंद्रकुमार दिग्दर्शित  'टोटल धमाल' या सिनेमात दोघंही काम करतायत. सिनेमा काॅमेडी आहे. शूटिंग येत्या जानेवारीपासून सुरू होतंय. रिलीजची तारीख अजून ठरली नसली, तरी सिनेमा दिवाळीत रिलीज करायचा प्रयत्न असेल.

इंद्रकुमारनं  माधुरी-अनिल कपूरचा 'बेटा' दिग्दर्शित केला होता. तीच जादू पुन्हा एकदा पहायला मिळणारेय 16 वर्षांनी.

First published: November 13, 2017, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading