मधुर भांडारकरने भारत गौरव केला सैन्याला समर्पित

मधुर भांडारकरने  भारत गौरव केला सैन्याला समर्पित

भारत गौरव पुरस्कार हा अमेरिकेतील अनिवासी भारतीयांकडून दिला जातो. हा पुरस्कार मधुरला युएन हॉलमध्ये दिला गेला.

  • Share this:

12 जून : मधुर भांडारकरला मिळालेला  भारत गौरव पुरस्कार त्याने अहोरात्र जागून देशाचं रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना, तसंच मधुरला   घडवणाऱ्या त्याच्या कुटुंबियांना समर्पित केलाय.ही माहिती त्याने  ट्वीट करून दिली.

मधुर भांडारकर हा बॉलिवूड मधला  एक प्रथितयश  दिग्दर्शक आहे. त्याने चांदनी बार ,फॅशन ,ट्रॅफिक सिग्नल,पेज3 सारखे वास्तवदर्शी आणि  सुपरहिट सिनेमे  दिग्दर्शित केलेत. त्याला  पद्मश्री पुरस्कारही मिळालाय.

भारत गौरव पुरस्कार हा अमेरिकेतील अनिवासी भारतीयांकडून दिला  जातो. हा पुरस्कार मधुरला युएन हॉलमध्ये दिला गेला.

सध्या तो आणीबाणीच्या काळावर बेतलेल्या  'इंदु सरकार' या चित्रपटावर काम करतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 01:02 PM IST

ताज्या बातम्या