Home /News /entertainment /

करण जोहर, अपूर्व मेहतावर चोरीचा आरोप; मधूर भंडारकरच्या Tweet नं उडाली खळबळ

करण जोहर, अपूर्व मेहतावर चोरीचा आरोप; मधूर भंडारकरच्या Tweet नं उडाली खळबळ

बॉलिवूडमध्ये (bollywood) आधीच वादात असलेला करण जोहर (karan johar) मधूर भंडारकरच्या (madhur bhandarkar) ट्वीटमुळे आता पुन्हा अडचणीत सापडला आहे.

    मुंबई, 20 नोव्हेंबर : सुशांत सिंह राजपूत (Sushant singh rajput) प्रकरणात वादात सापडलेला दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. करण जोहरवर चोरीसारखा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. दिग्दर्शक मधूर भंडारकरने (Madhur Bhandarkar) करण जोहरवर आरोप केला आहे. मधूर भंडारकरनं करण जोहरबाबत एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माता अपूर्व मेहता (Apoorva Mehta) यांच्यावर मधूर भंडारकरनं शीर्षक चोरीचा आरोप लावला आहे. आपल्या प्रोजेक्टच्या शीर्षकवर या दोघांनी डल्ला मारल्याचं मधूर भंडारकरनं सांगितलं आणि हे टायटल बदलण्यास सांगितलं आहे. मधूर भंडारकरनं ट्वीट केलं आहे की, "करण जोहर आणि अपूर्व मेहता तुम्ही माझ्याकडून वेबसाठी #BollywoodWives टायटल मागितलं होतं, मात्र मी हे टायटल वापरायला नकार दिला होता कारण या टायटलवर माझ्या एका प्रोजेक्टचं काम सुरू आहे. तरी तुम्ही द फेबुलस लाइव्स ऑफ़ बॉलीवुड वाइव्स म्हणून टायटलचा वापर केला, हे चुकीचं आहे. कृपया माझा प्रोजेक्ट उद्ध्वस्त करू नका. तुम्ही टायटल बदलावं असं आवाहन मी करतो" हे वाचा - '...हे अजिबात सहन करणार नाही', रणवीरची नवीन जाहिरात पाहून भडकले सुशांतचे चाहते नेटफ्लिक्सवर नुकतंच बॉलिवूड स्टार्सच्या पत्नींबाबत एक शो तयार करण्यात आला आहे. हा एक वेब रिअॅलिटी शो आहे. ज्याचं नाव Lives Of Bollywood Wives असं आहे. या शोचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. 27 नोव्हेंबरपासून हा शो नेटफ्लिक्सवर येणार आहे. याच शोच्या टायटलवर मधूर भंडारकरनं आक्षेप घेतला आहे. आपल्या टायटलचा वापर केल्यानं त्यानं नाराजी दर्शवली आहे आणि टायटल बदलण्याची माहणी केली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bollywood, Karan Johar

    पुढील बातम्या