सौंदर्याची मल्लिका मधुबालाच्या आयुष्यावर सिनेमा, 'या' अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

सौंदर्याची मल्लिका मधुबालाच्या आयुष्यावर सिनेमा, 'या' अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

मधुबालावर सिनेमा काढला जातोय, हे तिच्याच बहिणीनं मधुर ब्रिज भूषणनं सांगितलंय.

  • Share this:

मुंबई, ०९ जुलै : बाॅलिवूडमध्ये बायोपिकचं पिक आलंय. कलाकार असो वा खेळाडू... प्रत्येकावरचे बायोपिक गर्दी खेचतात. आता यात अजून एक नाव सामील होतंय. ते म्हणजे मधुबाला. होय, मधुबालावर सिनेमा काढला जातोय, हे तिच्याच बहिणीनं मधुर ब्रिज भूषणनं सांगितलंय. आणि मधुबालाच्या भूमिकेसाठी करिना कपूरचा विचार होतोय.

फक्त ३६ वर्षांचं आयुष्य जगलेल्या मधुबालानं बरेच चढउतार पाहिले. दिलीप कुमारपासून किशोर कुमारपर्यंत अनेक जण तिच्यावर फिदा होते. या सौंदर्याच्या मल्लिकेवरचा सिनेमा एखाद्या मोठ्या दिग्दर्शकाकडे सुपूर्द करणार आहेत.

मधुर ब्रिज मोहन यांनी मधुबालाच्या भूमिकेसाठी करिनाच्या नावाला पसंती दिलीय. अगोदर ही भूमिका माधुरी दीक्षितनं करावी असं त्यांना वाटत होतं. पण आता करिनाच फायनल असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा

ब्रेकअप,पॅचअप आणि आता साखरपुडा... काय चाललंय जस्टिन बिबरचं?

ही तर माझ्याच कर्माची फळं - माधुरी दीक्षित

पावसाळ्यात ओले कपडे घरात वाळत घालताय? मग हे वाचाच

करिना कपूरनं अजून होकार दिलेला नाही. पण करिनाच्या आयुष्यातला हा मोठा सिनेमा असेल. मधुबालासारख्या सौंदर्यवतीचे वेगवेगळे पैलू दाखवणं हे मोठं आव्हान असेल. मधुबालाची घायाळ अदा करिना कशी साकारते हे पाहायचं.

First published: July 9, 2018, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading