मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /माधवी गोगटे यांच्या निधनानंतर अनुपमा फेम रूपाली गांगुलीची भावनिक पोस्ट

माधवी गोगटे यांच्या निधनानंतर अनुपमा फेम रूपाली गांगुलीची भावनिक पोस्ट

रुपाली गांगुली आणि माधवी गोगटे यांनी ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेत एकत्र काम केले आहे.

रुपाली गांगुली आणि माधवी गोगटे यांनी ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेत एकत्र काम केले आहे.

रुपाली गांगुली आणि माधवी गोगटे यांनी ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेत एकत्र काम केले आहे.

मुंबई, 22 नोव्हेंबर: मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं वयाच्या 58 व्या वर्षी (madhavi gogate) निधन झालं आहे. त्यांनी मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात (madhavi gogate passes away) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे .त्यांच्या निधनानंतर अनुपमा (anupamaa) फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने (rupali ganguly) भावनिक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर माधवी यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटले आहे की, ‘मला तुमच्याशी खूप काही बोलायचे होते. पण तुम्ही त्या आधीच आम्हाला सोडून निघून गेलात’. अनेक कलाकारांनी माधवी गोगटे यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

रुपाली गांगुली आणि माधवी गोगटे यांनी ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेत एकत्र काम केले आहे. माधवी यांनी अनुपमाच्या आईची भूमिका यात साकारली होती. माधवी गोगटे यांनी मराठीसोबत हिंदीमध्ये देखील अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'मिसेस तेंडुलकर', 'कोई अपना सा', 'ऐसा कभी सोचा न था', 'एक सफर', 'बसेरा', 'बाबा ऐसो वर ढुंडो', 'ढुंड लेंगी मंजिल हमें', 'कहीं तो होगा' या हिंदी मालिकेत अभिनय केला आहे.

वाचा : 'बंटी और बबली 2' पाहून तैमूरचा बाबा सैफ अली खानवर प्रश्नांचा भडिमार ; म्हणाला, या सिनेमात तू नेमकं....

माधवी यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 'भ्रमाचा भोपळा', 'गेला माधव कुणीकडे' ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती. यासोबतच त्यांची 'घनचक्कर' या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials