S M L

'टायगर जिंदा है'च्या शूटसाठी मशीन गनचा वापर

सिनेमातील प्रत्येक अॅक्शन सीनच्या शूटसाठी एमजी 42 बंदुकांचा वापर करण्यात आलाय. या बंदुकांचा युद्धाच्या दरम्यानही मशीन गन म्हणून वापर करण्यात येतो.

Sonali Deshpande | Updated On: Oct 31, 2017 02:52 PM IST

'टायगर जिंदा है'च्या शूटसाठी मशीन गनचा वापर

31 आॅक्टोबर : अली अब्बास जफर दिग्दर्शित 'टायगर जिंदा है' सिनेमातील पोस्टरमधून आपण दबंग खान सलमानचा अॅक्शनपॅक्ड लूक तर पाहिलाच. पण या सिनेमातील अॅक्शन सीन्ससाठी सलमान फार मेहनत घेताना दिसतोय. सिनेमातील प्रत्येक अॅक्शन सीनच्या शूटसाठी एमजी 42 बंदुकांचा वापर करण्यात आलाय.  या बंदुकांचा युद्धाच्या दरम्यानही मशीन गन म्हणून वापर करण्यात येतो. एवढंच नव्हे तर सिनेमातील अॅक्शन सीनसाठी सलमानने तीन दिवसांत तब्बल 5000 वेळा फायर केलं असल्याचं अली जफर यांनी सांगितलंय.

अलीकडेच अबुधाबीमध्ये शूटिंग पूर्ण झाल्यानंतर, सलमान आणि कतरिना त्यांच्या टीमसह ग्रीसला इतर भाग शूट करण्यासाठी पोहचले.  सिनेमाच्या पोस्टर्सविषयी होणाऱ्या चर्चांवरून हा सिनेमा चांगलाच गाजणार असंही दिसतंय.

'टायगर जिंदा हे' हा सिनेमा अली जाफरच्या 'एक था टायगर'चा सिक्वेल आहे.  22 डिसेंबरला  सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 02:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close