मुंबई, 1 मार्च : माझी तुझी रेशीमगाठ ( maajhi tujhi reshimgath ) मालिका छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील यश आणि नेहाची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. यशसमोर नेहाने नुकतीच प्रेमाची कबुली दिली आहे. मग काय मालिकेत सध्या यश आणि नेहाच्या प्रेमाचा ट्रॅक सुरू आहे. प्रेक्षकांना देखील हा ट्रॅक आवडत आहे. आता प्रेमाची कबुली झाली त्यामुळे आता याहीपलीकडे जाऊन मालिकेत या दोघांच्यात सुपररोमॅंटिक सिन पाहायला मिळणार आहे. या सुपररोमॅंटिक सीनचे चित्रीकरण देखील पूर्ण झालं आहे. याचा प्रोमो देखील समोर आला आहे.
एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत लवकरच यश आणि नेहाच्यात सुपररोमॅंटिक सिन पाहायला मिळणार आहे. या सुपररोमॅंटिक सीनचे चित्रीकरण देखील पूर्ण झालं आहे. याचा प्रोमो देखील समोर आला आहे. यामध्ये नेहा पांढऱ्या रंगाच्या वनपिसमध्ये तर यश काळ्या रंगाच्या ब्लेजरमध्ये दिसत आहे. यावरुन तर असचं दिसत आहे की, यशने नेहासाठी रोमॅंटिक डेटचा प्लॅन केला असावा. दोघंही खूप छान दिसत आहेत. यशसोबत नेहा डान्स करताना दिसत आहे. सगळं वातावरणचं कसं सुपररोमॅंटिक झालं आहे. प्रेक्षकांना तर या दोघांची केमिस्ट्री आवडतेच पण आता त्यांचे हे सुपररोमॅंटिक सीन पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कमेंट करत अनेकांनी याला पसंती दर्शवली आहे.
वाचा-'पावनखिंड'मध्ये सोयराबाईंची भूमिका साकारणाऱ्या रुचीचा पतीसुद्धा आहे अभिनेता
नेहा आणि यश जरी प्रेमात असले तरी त्यांचा प्रेमाच प्रवास कठीण असणार आहे. परीनं यशला बाबा मानन्यास नकार दिला आहे. शिवाय नेहाचं सत्य यशच्या आजोबांना समजेल तेव्हा ते काय निर्णय घेणार. याशिवाय सिम्मी देखील आहेच. ती या दोघांना एकत्र येऊन देईल का, हा प्रश्न देखील प्रेक्षकांना सतावत आहे. त्यामुळे या जोडीला या सर्वाचा सामना करूनच रेशीमगाठ म्हणजे लग्नगाठ बांधावी लागणार आहे हे नक्की.
यशची भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे तर नेहाची भूमिका प्रार्थना बेहेरे साकारताना दिसत आहे. मोठा पडद्या गाजवल्यानंतर या कलाकारांनी या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. याशिवाय मालिकेत मोहन जोशी, संकर्षण कऱ्हाडे यासारखी तगडी स्टारकास्ट देखील आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.