राजकुमारनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लुडो सिनेमाचा पहिला लुक शेअर केला. ज्यात तो मुलीच्या गेटअपमध्ये खूप वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. त्यानं हिरवा लेहंगा घातला आहे. मोकळ्या लांब केसांचा विग लावला आहे. यावरुन अंदाज लावला जाऊ शकतो की त्यानं हा गेटअप कोणत्यातरी नाटकासाठी केला असवा. तर दुसरीकडे तो एका अतिशय अत्रंगी मुलाच्या लुकमध्ये दिसत आहे. त्याचा हा लुक रेट्रो आहे. 80च्या दशकातील हेअरस्टाइलमध्ये तो एखाद्या जुन्या अभिनेत्याप्रमाणे दिसत आहे.
राजकुमार या लुकमध्ये एका बाइकवर बसलेला दिसत आहे तर त्या बाइकवर मिथुन चक्रवर्ती यांचा कोई शक हा डायलॉग सुद्धा लिहिलेला दिसत आहे. या सिनेमात दंगल फेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग बासूनं केलं आहे. काही दिवसांपूर्वी अनुराग बासू राजकुमार राव आणि अभिषेक बच्चन यांना घेऊन एक सिनेमा तयार करत असल्याचं बोललं जात होतं. मात्र या दोन्ही वेगवेगळ्या कथा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Rajkumar rao