विराट-अनुष्का आणि शाहीद-मीराचा हा रोमँटिक अंदाज पाहिलात का?

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते, असं पाडगावकर म्हणून गेले. आणि खरंय ते. हल्ली या प्रेमाचा इजहार सगळेच सेलिब्रिटी अगदी उघडपणे करतायत.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2018 03:30 PM IST

विराट-अनुष्का आणि शाहीद-मीराचा हा रोमँटिक अंदाज पाहिलात का?

मुंबई, 01 आॅगस्ट : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते, असं पाडगावकर म्हणून गेले. आणि खरंय ते. हल्ली या प्रेमाचा इजहार सगळेच सेलिब्रिटी अगदी उघडपणे करतायत.  मग सोनम कपूरला आनंद आहुजानं अचानक रस्त्यात उचलणं असो किंवा आलिया-रणवीरनं एकमेकांच्या हातात हात घालून फिरणं असो. अगदी दीपिका-रणवीर सिंगही आपलं प्रेम कधी लपवत नाहीत. अशा 'प्रेम'ळ वातावरणानं सेलिब्रिटी उत्साहित राहतात.

असं प्रेम व्यक्त करण्यात आघाडीवर असतात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. सोशल मीडियावर दोघंही एकदम मोकळेपणे एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करत असतात. नुकताच दोघांनी इन्स्ट्राग्रामवर एक फोटो पोस्ट केलाय. त्यावर विराटनं लिहिलंय,  अनुष्कासोबत नुसतं चालत राहणंही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. क्रिकेट स्टेडियमवर एकदम तापट वाटणारा विराट आयुष्यात खूप रोमँटिक आहे. अनुष्काच्या बाबतीत तो फार हळवा आहे.

शाहीद कपूर आणि त्याची बायको मीराही एक रोमँटिक जोडी आहे. नेहमीच ते आपलं प्रेम व्यक्त करत असतात. आता मीरानं सोशल मीडियावर शाहीदला आलिंगन दिलंय आणि म्हटलंय,  असा कुणी शोधा ज्याला तुम्ही मिठी मारू शकता, चुंबन घेऊ शकता, त्याच्याशी मारामारी करू शकता, तरीही तो तुम्हाला सोडून जात नाही.

ही दोन्ही जोडपी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली आहेत. आणि वेळोवेळी ते प्रेम खुले आम व्यक्तही करतात. त्यांचे फॅन्सही मग या सगळ्या गोष्टी एंजाॅय करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2018 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close