हेही वाचा - सोनाली कुलकर्णीने पहिल्यांदाच दाखविली सासरची झलक,अभिनेत्रीसाठी सासूबाईंनी केलं हे खास काम अक्षयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अक्षयाने पिवळी साडी नेसलीय तर भूषणने छान सदरा घालताय. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घातले असून दोघेही एकमेकांकडे पाहत रोमँटीक झालेले पहायला मिळत आहेत. अक्षया आणि भूषण पुन्हा एकदा नवरा नवरीच्या वेशात फारच गोड आणि सुंदर दिसत आहेत. फोटोंसहीत अक्षयाने दोघांचा डान्स रिल्स देखील शेअर केला आहे. ज्यात दोघेही अत्यंत रोमँटिक झाले असून एका प्रसिद्ध साऊथ गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहे.View this post on Instagram
अक्षयाने लग्नानंतरचे हनिमूनचे फोटो देखील शेअर केलेत. ज्यात ती स्विमींग पुलमध्ये रॉकिंग अंदाजात दिसत आहे. अक्षयाने हातावर काढलेली भूषणच्या नावाची मेहंदी चांगलीच रंगली असून स्विमींग पूलमधील फोटोंमध्ये चांगलीच उठून दिसत आहे. तिच्या हातावरच्या मेहंदी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षयाने 2017मध्ये भूषण वाणीसोबत विवाह केला. भूषण देखील सिनेसृष्टीशी निगडीत आहे. तो सिनेमॅटोग्राफर आहे. अक्षया आणि भूषण यांच्या लग्नातील लूकनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment