Home /News /entertainment /

पाहा VIDEO : Love Aaj Kal मधील गाण्याची कॉपी उघड? iPhone कनेक्शन आलं समोर

पाहा VIDEO : Love Aaj Kal मधील गाण्याची कॉपी उघड? iPhone कनेक्शन आलं समोर

'लव आज कल' चित्रपटात असलेल्या गाण्यामधील एक दृश्य कॉपी केल्याचा VIDEO समोर आला आहे.

  मुंबई, 31 जानेवारी : बॉलिवूड चित्रपटातील अनेक गाणी, दृश्य, फाईट सीन्स अगदी पोस्टरसुद्धा कशावरून तरी कॉपी करून प्रेक्षकांसमोर आणलं जातं, अशी ओरड अनेकदा केली जाते. त्यात किती तथ्य असतं किंवा कलाकार ज्याला इन्स्पिरेशन - प्रेरणा म्हणतात ती किती असते हा भाग वेगळा. पण असं असलं तरीही प्रेक्षक चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतात. आता हे पुन्हा एकदा समोर आलं आहे लव आज कल या सिनेमाच्या निमित्ताने. अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या आगामी लव आज कल2 हा चित्रपटच मुळात सीक्वेल आहे. पण आता वाद होतोय एका गाण्यावरून. इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल 2' चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. पण त्याआधीच चित्रपटात असलेल्या गाण्यामधील एक दृश्य कॉपी केल्याची ओरड होत आहे. गाण्यातलं दृश्य कशावरून कॉपी केलंय तो VIDEO आता समोर आला आहे. 'लव आज कल2' चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पंसतीस उतरत आहेत. ‘हां मैं गलत’ या गाण्याने देखील प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. YouTube वर या गाण्याला कोट्यवधींचे व्ह्युज मिळत आहेत. पण गाण्यात असलेल्या एका दृश्यावर आक्षेप घेणारा व्हिडिओ समोर आला असून आयफोनच्या एका जाहिरातीशी त्या दृश्याचं साधर्म्य आहे. डायट सब्या या Instagram अकाऊंटवर, iPhone ची ती जाहिरात आणि चित्रपटातील गाण्याचं दृश्य एकाचवेळी दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
  View this post on Instagram

  And I oop... . . . Apple ad by Spike Jonze; #loveaajkal by Imtiaz Ali

  A post shared by Diet Sabya (@dietsabya) on

  आयफोनची ही जाहिरात आणि चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला सेट आणि दृश्यांमध्ये काहीसं साम्य आहे. त्यामुळे गाण्यामधलं हे दृश्य चर्चेत आहे. या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर, इम्तियाज अलीने हे गाणं ‘ट्विस्ट’च्या थीम ट्यूनबरोबर तयार केले आहे.पार्श्वगायक अरिजित सिंह आणि शाश्वत सिंहने हे गाणं गायलं आहे. या गाण्यावर कार्तिक आर्यन, सारा अली खान आणि आरुषी शर्मा थिरकताना दिसत आहेत.
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: February movie 2019, New movie

  पुढील बातम्या