मुंबई, 05 एप्रिल: दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एका साखळी चोराला अटक केली आहे. त्याने क्रिकेट सट्टेबाजीत 30 लाख रुपये हारल्यानंतर, नुकसान भरून काढण्यासाठी चेन स्नॅचिंगला (Chain Snatcher) सुरुवात केली होती. पण त्याचा हा चोरीचा उद्योग फार काळ टिकला नाही. पोलिसांनी त्याला नुकतचं अटक (arrest) केलं आहे. हा आरोपी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील अभिनेता असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र आता याबाबत तारक मेहताच्या टीमनं याबाबत अधिकृत खुलासा केला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्यांनी अधिकृत निवेदनामध्ये म्हटलं की, 'चेन स्नॅचिग प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचं तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेशी काहीही संबंध नाही. मिराज वल्लभदास कापडी नावाच्या व्यक्तीनं कधीही तारक मेहता का उल्टा चष्माच्या टीमसोबत काम केलं नाही.' पोलिसांनी ज्या साखळी चोराला अटक केलं आहे. त्याचं नाव मिराज कापडी असून त्याचं क्रिकेट सट्टेबाजीत 30 लाखांचं नुकसान झालं होतं. त्यामुळे डोक्यावर झालेलं कर्ज फेडण्यासाठी त्याने गुन्हेगारीचा अवलंब करत चोर बनला आहे.
गुप्त माहिती मिळाल्यानंतर रांदेर पोलिसांनी रांदेर भेसान चौकाजवळ सापळा रचून मिराज वल्लभदास कापडी आणि वैभव बाबू जाधव याला अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी 3 सोनसाखळ्या, 2 मोबाइल फोन आणि चोरी केलेली दुचाकी जप्त केली आहे. या दोघांकडून एकूण 2 लाख 54 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी वैभव आणि मिरज हे दोघंही जुनागडचे रहिवासी आहेत.
(हे वाचा - Taarak Mehta Ka Ooltah Chasmah च्या सेटवरुन आली GOOD NEWS! अखेर चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार!)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी निर्मनुष्य रस्त्यावरील महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन साखळ्या हिसकावून नेत असतं. आतापर्यंत त्यांनी विविध ठिकाणी असे गुन्हे केले आहेत. वैभव आणि मिराजवर महिधरपुरा, उधना आणि रांदेर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावेळी आरोपींनी सांगितलं की, क्रिकेट सट्टेबाजीत 25 ते 30 लाखांचं नुकसान झाल्यानं त्यांच्यावर कर्जाचा बोझा वाढला होता. या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी या मार्गाचा अवलंब केला आहे. पोलीस या घटनेची पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news