बॉलिवूडमधल्या अपयशानंतर सेक्स वर्कर होणार होता 'हा' अभिनेता, आता भाजपने दिलं लोकसभेचं तिकीट

बॉलिवूडमधील सिनेमे अयशस्वी ठरल्यानंतर भोजपुरी सिनेमात पदार्पण करणारे रवी किशन आज भोजपुरीमधील स्टार अभिनेता मानले जातात.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 06:23 PM IST

बॉलिवूडमधल्या अपयशानंतर सेक्स वर्कर होणार होता 'हा' अभिनेता, आता भाजपने दिलं लोकसभेचं तिकीट

मुंबई, 15 एप्रिल : अभिनेता रवी किशन उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपनं जाहीर केलेल्या 21व्या यादीत याची अधिकृत घोषणा करण्यात आली. 2014मध्ये रवी किशन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत रवी किशन यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जौनपूरमधून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली होती.Loading...


रविकिशन शुक्ला हे त्यांचं मूळ नाव. रवी किशन नावाने ते चित्रपट क्षेत्रात ओळखले जातात. भोजपुरी सिनेमातला सुपरस्टार अशी त्यांची ओळख आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत हरल्यानंतर 2017मध्ये रवी  किशन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  त्यानंतर आता 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. लवकरच ते उमेदवारी अर्ज दाखल करतील.


पाहा : VIDEO शशी थरूर यांना दुखापत; कपाळाला सहा टाके


वाचा : Kaagar Movie Trailer: 'कधी कधी शर्यत जिकडून सुरू होते तिथंच येऊन संपते'


भोजपुरी सिने इंडस्ट्रीमध्ये नाव कमवलेल्या रवी किशन यांना बॉलिवूडमध्ये मात्र फराशी चमक दाखवता आली नव्हती. बॉलिवूडमधील सिनेमे अयशस्वी ठरल्यानंतर भोजपुरी सिनेमात पदार्पण करणारे रवी किशन आज भोजपुरीमधील स्टार अभिनेता मानले जातात. रवी किशनचा सुवर्णकाळ सध्या संपला असला तरीही सुपरस्टार अशी ओळख असलेले रवी किशन आजही भोजपुरीमधील सर्वात महागडे अभिनेते आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार रवी किशन एका सिनेमासाठी 50 लाख रुपये घेतात.

भोजपुरीपासून बॉलिवूड पर्यंत सर्वच प्रेक्षक रवी किशन यांच्या अभिनयाचे चाहते आहेत. मात्र अभिनय क्षेत्रात स्वतःचं वेगळ अस्तित्व निर्माण करणाऱ्या रवी किशन यांना इथपर्यंत पोहचायला खूप मेहनत करावी लागली. 'सिनेमा मिळत नसल्यानं मी सेक्स वर्कर बनण्याचाही निर्णय घेतला होता, मात्र यावेळी माझ्या वडिलांनी मला खूप पाठिंबा दिला आणि हे सर्व करण्यापासून रोखलं,' असं एका मुलाखतीत रवी किशन यांनी सांगितलं होतं.


 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 06:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...