मुंबई, २४ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत अक्षय आणि मोदी यांनी खासगी आयुष्यावर भरभरून गप्पा मारल्या. अक्षयने एएनआयसाठी घेतलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, ट्विटरवर ते ट्विंकल खन्नाचे पोस्ट पाहतात. पीएम मोदी यांच्या या टिपणीवर आता ट्विंकल खन्नाची रिअॅक्शन आली आहे.
ट्विंकने भाजपची ट्विंटरवरील पोस्ट शेअर करत म्हटलं की, ‘माझ्याजवळ ही पोस्ट पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन आहे. मी कोणतरी आहे हेच फक्त प्रधानमंत्री यांना माहिती नाहीये तर ते माझं कामही पाहत आहेत.’
तुमच्या घरातली भांडणं तर माझ्यामुळेच कमी होत असतील, मोदींचा अक्षयला चिमटा
I have a rather positive way of looking at this-Not only is the Prime Minister aware that I exist but he actually reads my work :) 🙏 https://t.co/Pkk4tKEVHm
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) April 24, 2019
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार काही वेळासाठी अभिनेत्याच्या भूमिकेतून रिपोर्टरच्या भूमिकेत शिरला होता. आता रिपोर्टर व्हायचं म्हटल्यावर प्रश्न तर विचारावेच लागतील ना... मग काय प्रश्न विचारण्यासाठी त्याने चक्क पंतप्रधानांचीच मुलाखत घ्यायचं ठरवलं. यावेळी खिलाडी कुमारने असे काही प्रश्न विचारले की ते ऐकून पंतप्रधान मोदी जोरजोरात हसायला लागले. ही संपूर्ण मुलाखत सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
अक्षय कुमारने विचारला असा काही प्रश्न की, हसायला लागले नरेंद्र मोदी
यावेळी सोशल मीडियाशी निगडीतही अनेक प्रश्न अक्षयने मोदींना विचारले. यावेळी पंतप्रधान मोदींनी अक्षय कुमारच्या पत्नीचा ट्विंकल खन्नाचाही उल्लेख यावेळी केला. मोदी म्हणाले की, ‘मी तुम्हाला आणि ट्विंकल यांनाही ट्विटरवर पाहतो. त्या माझ्यावर एवढ्या राग काढतात की कधी कधी मला वाटतं की, तुमच्या घरात फार चांगलं वातावरण असेल कारण ट्विंकल त्यांचा सगळा राग माझ्यावर ट्विटरवरच काढतात.’
अधुरी एक कहाणी- ...म्हणून प्रेम असूनही आज एकत्र नाहीत सनी देओल आणि डिंपल कपाडिया
हलक्या फुलक्या अंदाजात मोदी पुढे म्हणाले की, ‘कधी कधी मला वाटतं की त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघत असेल. याचा फायदा तुम्हाला होत असेल. मी तुमच्या असा कामी आलो आहे.. खासकरून ट्विंकल यांच्या...’
ट्विंकल अनेकदा सोशल मीडियावर चालू घडामोडींवर आपलं मत आवर्जुन मांडते.
VIDEO: ...तेव्हा आंबा विकत घेण्याचीही ऐपत नव्हती - पंतप्रधान मोदी