‘मोदी तुम्ही तर पूर्णपणे मनातून उतरलात’, ट्वीटनंतर अभिनेता प्रियदर्शन जाधव झाला ट्रोल

‘मोदी तुम्ही तर पूर्णपणे मनातून उतरलात’, ट्वीटनंतर अभिनेता प्रियदर्शन जाधव झाला ट्रोल

सामान्य माणसाला काहीच कळत नाही, अशा भ्रमात राहू नका. ही तीच माणसं आहेत ज्यांनी तुम्हाला सत्ता दिली आणि काँग्रेसला घरी बसवलं

  • Share this:

मुंबई, 8 मे- "तुमच्या वडिलांच्या पाठिराख्यांनी त्यांची 'मिस्टर क्लिन' अशी प्रतिमा तयार केली. पण 'भ्रष्टाचारी नंबर 1' अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला," असा टोला राहुल गांधी यांना लगावत मोदींनी दिवंगत राजीव गांधींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यानंतर चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका झाली होती. मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधवनेही ट्विटरच्या माध्यमातून यावर आपलं मत व्यक्त केलं.

प्रियदर्शन याने ट्विटरवर नरेंद्र मोदी यांना टॅग करत, ‘राजीव गांधी ह्यांच्या विधानाने तर पूर्णपणे मनातून उतरलात ! सामान्य माणसाला काहीच कळत नाही, अशा भ्रमात राहू नका. ही तीच माणसं आहेत ज्यांनी तुम्हाला सत्ता दिली आणि काँग्रेसला घरी बसवलं....(बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही)’ अशी जहरी टीका केली. नेमकी हीच गोष्ट मोदी समर्थकांना आवडली नाही. मग ट्विटरवर प्रियदर्शन विरुद्ध मोदी समर्थक असा वाद सुरू झाला.दिलदार अक्षय कुमार, फानी चक्रीवादळातील पीडितांसाठी केली 1 कोटींची मदत

बिग बर्ड नावाच्या ट्विटर अकाउंटवरून ‘जो काही निर्णय असेल तो तुला 23 मे रोजी कळलेच’ असं सुनावलं. तर अनिकेत सर्वणकरने, ‘काँग्रेसने मोदींच्या आई आणि पत्नीचं नाव घेऊन राजकारण केलं होतं ते चाललं का?’ असा प्रश्न विचारला. तर विशाल पाटील नावाच्या व्यक्तीने प्रियदर्शनला ट्वीट करत म्हटलं की, ‘मोदींविरुद्ध टीका करून तुम्ही आमच्या मनातून उतरलात.’प्रियांकाची फॅशन सोडा, निकच्या मनगटावरचं घड्याळ पाहा; किंमत ऐकून व्हाल थक्कएकीकडे प्रियदर्शनवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत असताना काहींनी त्याला समर्थनही दाखवलं. सुशांत उपाध्ये यांनी प्रियदर्शला टॅग करत म्हटलं की, ‘इतर कलाकार याबद्दल काहीच बोलत नसताना तुम्ही यावर बोललात हे फार महत्त्वपूर्ण आहे.’ तर प्रणव वाकचाउरे यांनी प्रियदर्शला उत्तम आणि गुणी ,सामाजीक जाण असलेले अभिनेता असं म्हटलं.20 लाखांचं मंगळसुत्र, 90 लाखाची अंगठी, एवढे महागडे दागिने घालतात बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी परस्परांवर जोरदार टीका करताना दिसतात. ‘चौकीदार चोर है’ अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना दिसत आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देखील राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे बोलताना मोदी म्हणाले की, तुमचे वडील राजीव गांधी ‘मिस्टर क्लिन’ म्हणून ओळखले जात होते. पण, ‘मिस्टर क्लिन’चा कार्यकाळ हा ‘भ्रष्टाचारी नंबर 1’ म्हणून संपल्याची टीका त्यांनी केली.

VIDEO : जगाचं लक्ष लागलेल्या World of Dance या शोचा 'किंग' ठरला मुंबईचा हा ग्रूप

SPECIAL REPORT : फॅशनच्या नावाने चांगभलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 09:53 AM IST

ताज्या बातम्या